शेतकरी बांधवांच्या पिकांच्या सौरक्षणासाठी राज्य सरकारची तार कुंपण योजना, जाणून घ्या सविस्तर | Tar Kumpan Yojana

शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे असे आपण म्हणतो शेतकरी बांधवांना शेतीतून उत्पन्न मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते असंख्य कष्ट करून शेतकरी आपले शेत बहारात असतो त्यासाठी पिकाचे रक्षण करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. चोरांपासून आणि वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे नाहीतर ऐक सुगीच्या काळात नुकसान होण्याची फार मोठी भीती असते त्या साठी राज्य सरकार ने शेतकरी बांधवांच्या पिकांच्या रक्षणसाठी तार कुंपण योजना आखली आहे तर जाणून घेऊया सविस्तर.

Tar Kumpan Yojana
Tar Kumpan Yojana

काय आहे तार कुंपण योजना

महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना तयार करत आहे आता पण तशीच एक योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी तयार केली आहे म्हणजेच तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

शेतकरी हा देशाचा बळीराजा म्हणून ओळखला जातो. जर शेतकऱ्याने राना मध्ये पीक पिकवले तरच संपूर्ण देशाला अन्न धान्य मिळणार. म्हणूनच महाराष्ट्र सरकार शेतीच्या बाच्यावा साठी नेहमीच काळजी करत असते.

म्हणूनच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्याला आत्यंत महत्वपूर्ण योजना आमलात आणली आहे तार कुंपण योजना महाराष्ट्र राज्य २०२४ या योजने मुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतीचे सौरक्षण करण्यासाठी आणुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना घेण्यात येणार आहे.

तार कुंपण योजना ही शेतकऱ्याच्या शेतीला जंगली प्राण्यांपासून सौरक्षन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आमलात आणली आहे व तसेच ज्या शेतकऱ्याच्या जमिनी जंगली भागाच्या जवळ पास आहेत त्या शेतकऱ्याच्या शेतीला हिंस्र प्राणी यांचा धोका जास्त निर्माण होतो त्या मुळे आपल्या घरगुती कुंपणाने ही जास्त काळ टिकत नाहीत व वन्य जीव हे शेतीची नसतुस करतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याच्या हिता साठी तार कुंपण योजना ही आमलात आणली आहे.

तार कुंपण योजना मुख्य उद्देश

1) तार कुंपण योजनेचा उद्देश हा वन्य प्राण्यापासून शेतिला वाचवण्या साठी आहे.

2) शेतकऱ्याला शेतीचा बचाव करण्यासाठी आर्थिक मदत मिळते.

तार कुंपण योजनेचे फायदे

1) पिकांचे संरक्षण  :-

 तार कुंपण योजनेमुळे भटक्या तसेच वन्य प्राण्यांपासून होणारे पिकाचे नुकसान टाळता येते. पिकांचे संरक्षण करता येते.पिकांचे संरक्षण योग्यरित्या झाल्यामुळे उत्पनामध्ये वाढ होते.

2) आर्थिक फायदे :-

तार कुंपण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत केली जाते. या योजनेमुळे पिकांचे आणि शेतकरी बांधवांचे संरक्षण होईल शिवाय उत्पनामध्ये सुद्धा भरघोस वाढ होऊन शेतकऱ्याला आर्थिक फायदा मिळतो.

3) शेतीची सुरक्षितता :-

वन्य प्राण्यांपासून पिकांची सुरक्षा शिवाय चोरांपासून पिकाची सुरक्षा करण्यास फायदेशीर ठरणार

4) मजबूत बांधणी :-

तार कुंपण योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा वापर करून शेतकरी चांगल्या प्रकारच्या  साहित्याचा वापर करून कुंपणाचे काम मजबूत करून घेऊ शकतो.

मजबूत बांधणीमुळे सारखे सारखे कुंपण बदलावे लागत नाही.

तार कुंपण योजना पात्रता

1) योजनेसाठी अर्ज केलेला शेतकरी हा संबधित शेतजमिनीचा स्वतः मालक असावा किंवा अर्जदार शेतकरी हा भाडे तत्वावर शेती करणारा असावा.

2) सदरच्या जमिनीवर अर्जदार शेतकऱ्याचे अतिक्रमण नसावे.

3) सदरची जमीन हि वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गात नसावी.

4) ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास सदरच्या जमिनीमध्ये वन्य प्राण्यांकडून हस्तक्षेप होऊन नुकसान होत असलेला ठराव जोडावा.

 5) या योजनेअंतर्गत शासनाकडून शेतकरी वर्गाला ९०% अनुदान दिले जाणार शिवाय राहिलेली १०% रक्कम हि अर्जदार शेतकऱ्याला स्वताच्या खिशातून घालावी लागणार.

तार कुंपण योजना आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड.

2) जमिनीचा सात बारा उतारा.

3) जमिनीचा आठ अ उतारा.

4) जात प्रमाणपत्र.

5) ग्रामपंचायतीचा दाखला.

6) समितीचे ठराव प्रमाणपत्र.

7) संबंधित वन परीक्षेक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

8) बँक खाते.

1 thought on “शेतकरी बांधवांच्या पिकांच्या सौरक्षणासाठी राज्य सरकारची तार कुंपण योजना, जाणून घ्या सविस्तर | Tar Kumpan Yojana”

Leave a Comment