मागेल त्याला पी व्ही सी पाईप, वाचा पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना सविस्तर

शेती साठी आवश्यक 2 गोष्टी आहेत एक म्हणजे खत- माती आणि दुसरे म्हणजे पाणी. शेती चा सर्वांगिक विकास हा केवळ सिंचन पद्धती मुळे झाला आहे. आजकाल शेतकरी वर्ग वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचनाचा उपयोग करतात त्यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन परंतु कोणतेही सिंचन करायचे असल्यास त्या साठी आवश्यक असते म्हणजे पी व्ही सी पाईप. वाढती महागाई आणि वाढत्या पी व्ही सी पाईप च्या मागणीमुळे पी व्ही सी पाईप च्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे सिंचन प्रणाली विकसित करण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना  राबवली आहे.

PVC Pipe Anudan Yojana
PVC Pipe Anudan Yojana

पीव्हीसी पाईप अनुदान | PVC Pipe Anudan Yojana

पिकाला पाणी देण्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर पाईप चा वापर होतो परंतु वाढत्या महागाई मुळे राज्य सरकार शेतकरी वर्गाला पाईप मध्ये अनुदान देत आहे. पाईप खरेदी वरती राज्य सरकार 50% इतके अनुदान देते जे जवळपास 15 हजाराच्या आसपास आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

या अनुदानामध्ये जर एचडीपी पाईप साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 50 रुपये प्रति मीटर व जास्तीत जास्त 300 मीटर  पर्यंतच्या पाईप साठी अनुदान हे दिले जाते.

जर तुम्ही पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 500 मीटर पाईप साठी अनुदान हे दिले जाईल.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला तर तुम्हाला त्यानंतर तुमच्या जमिनीचा सातबारा ८अ उतारा हा व ज्या दुकानातून तुम्ही पीव्हीसी पाईप खरेदी करणार त्या दुकानाचं कोटेशन बिल व तुमच बँक पासबुक देखील तुम्हाला (Mahadbt.in) या पोर्टल वरती अपलोड करावे लागते त्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर तुम्हाला अनुदान हे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाते.

पीव्हीसी पाईप योजना आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थींकडे आधार कार्ड,पॅन कार्ड  मोबाईल क्रमांक व तुमची ईमेल आयडी तुम्हाला लागणार आहे. या सोबतच जमिनीचा सात बारा आणि आठ अ उतारा आणि रहिवाशी धाकला या कागदपत्रांची आवश्यकता असते.

अर्ज कोठे करावा

राज्य सरकारच्या Maha DBT पोर्टल वर शेतकरी वर्गाने नोंदणी करावी आणि तिथून पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना सिलेक्ट करून सर्व अचूक माहिती भरावी आणि फॉर्म सबमिट करावा.

Leave a Comment