राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विभागातील शासन निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग शेतकऱ्यांसाठी काय शासन निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊयात.

महत्त्वपूर्ण शासन निर्णय
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पीक विम्याबाबत महत्वाचं निर्णय घेतला आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये सतत पीक विम्याबद्दल घोटाळे समोर येत होते. हेच पाहता सरकारने या योजनेत सुधारणा करण्याचे ठरवले आहे. त्याचमुळे आता लवकरच राज्यात नवीन सुधारित पीक विमा योजना लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आता या बदलामुळे कोणतेही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मागील काही काळात पिक विमा योजनेत घोटाळे पाहायला मिळाले. एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली पण यामध्ये बोगस अर्ज पाहायला मिळाले. त्यामुळे गरजू शेतकरी मागे राहून इतरांना त्याचा लाभ मिळाला. म्हणून सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी सुधारित योजना
तसेच केवळ पिक विमा कंपनीचा फायदा न होता शेतकऱ्यांना याचा लाभ झाला पाहिजे, असा विचार सरकार करत आहे. यानुसार नव्या योजनेची आखणी सरकारने केली आहे. तसेच राज्यतील शेतीचे क्षेत्र वाढवणे आणि ट्रॅक्टर, ड्रीप, मल्चिंग पेपर, बीबीएफ यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र योजना आखली आहे. तसेच सरकारने योजनेत नेमके काय बदल केले आहेत हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.