शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा १.२५ लाखांचे अनुदान – जाणून घ्या संपूर्ण माहिती

कृषी उत्पादनात वाढ करायची असल्यास यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेती करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेती यांत्रिकीकरणाच्या योजना राबवल्या जातात. याच श्रेणीत येणारी ट्रॅक्टर अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. पूर्वी ही योजना केंद्र पुरस्कृत होती, परंतु सध्या ती योजना केंद्र सरकारने थांबवली आहे.

या योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती-जमाती, अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ट्रॅक्टरच्या किंमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १.२५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तर इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ४०% किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान फक्त १५ HP ते २५ HP क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी लागू आहे, कारण अशा प्रकारचे ट्रॅक्टर सामान्यतः २.५ ते ६ लाख रुपयांच्या किंमतीच्या दरम्यान असतात.

ही योजना महाडीबीटी (mahadbt.maharashtra.gov.in) या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे ‘Farmer ID’ असणे आवश्यक आहे.

या पोर्टलवर लॉगिन करून शेतकऱ्यांनी आपली प्रोफाईल १००% पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अर्ज करताना जातीचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास), ७/१२ उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक असतात.

प्रोफाईलमध्ये जर काही माहिती अपूर्ण असेल तर ती पूर्ण केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही. अर्ज प्रक्रिया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित आहे.

शेतकरी बांधवांनी ही संधी दवडू नये. जे शेतकरी अत्यल्प जमीनधारक आहेत, महिला शेतकरी आहेत किंवा अनुसूचित जाती-जमातीतील आहेत, त्यांना विशेष लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्यांनो 1 जुलैपासून होणार मोठा बदल – नवीन पीक विमा हप्ता एवढा असणार!

ट्रॅक्टर खरेदी केल्यास शेतकामाची गती वाढते, वेळेची बचत होते आणि शेतीत उत्पादनक्षमता वाढते. त्यामुळे या योजनेत सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची ही एक उत्तम संधी आहे.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा १.२५ लाखांचे अनुदान – जाणून घ्या संपूर्ण माहिती”

Leave a Comment