राज्य सरकार सतत महिलांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरू करत आहे. जेणेकरून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता होईल. म्हणजेच या योजनांच्या माध्यमातून महिला आयुष्यात काहीतरी करून दाखवतील. अलीकडेच राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर हस्तांतरीत केले जातात. आता याच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार एक जबरदस्त शासन निर्णय घेणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी सरकार नव्या योजनेच्या तयारीत
तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार एक संभाव्य योजना आणण्याच्या तयारीत आहे. लाडक्या बहिणींना राज्य सरकार स्वतःची पायावर आर्थिकदृष्ट्या उभं करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यासोबतच त्यांना व्यवसाय करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या हमीवर राज्य सरकार ज्या महिला व्यवसाय करू इच्छित आहेत, परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही अशा महिलांना सरकार कर्ज देणार आहे.
लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज
महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेच्या हमीवर राज्य सरकार कर्ज उपलब्ध करून देणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना दिली. महिलांना 30 ते 40 हजारांपर्यंत कर्ज या योजनेच्या हमीवर मिळणार आहे. या कर्जाच्या हप्त्याची परतफेड सरकारकडून म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमधून केली जाणार आहे. सरकार अशाप्रकाची योजना आखण्याचे तयारीत आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी
त्याचवेळी बोलताना अजित पवार असेही म्हटले आहे की, राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी 45 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे एखाद्या महिन्यात हप्ता देण्यासाठी विलंब होतो आणि विरोधक लगेच अफवा पसरवतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनी विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास देऊ नये. राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, असे आश्वासन देखील अजित पवार यांनी दिले आहे.