सरकारच्या ‘या’ जोखीममुक्त योजनेत करा गुंतवणूक अन् मिळवा दुप्पट रक्कम!

Kisan Vikas Patra – आजकाल गुंतवणूक करणे फार महत्वाची गोष्ट बनली आहे. नाहीतर सध्याच्या महागाईच्या काळात हातात पैसा टिकणे खूप अवघड आहे. आता अनेक लोक गुंतवणूक ही शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात करतात. यामध्ये मोठा परतावा तर मिळतोच परंतु यात जोखीम देखील पत्करावी लागते. त्यामुळे काहीजण असेही आहेत त्यांना गुंतवणूक करायची आहे आणि चांगला परतावा ही मिळण्याचा आहे, परंतु जोखीम घ्यायची नाही. तुम्ही पण त्यातलेच आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Kisan Vikas Patra
Kisan Vikas Patra

किसान विकास पत्र योजना

आता अनेकांना गुंतवुकीतून चांगला परतावा मिळवायचा असतो अशा लोकांसाठी ‘किसान विकास पत्र योजना’ उत्तम आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तर सरकारची जुनी आणि छोटी लोकप्रिय असलेली किसान विकास पत्र ही योजना आहे. ही योजना सरकारने 1988 साली सुरू केली आहे.

खरतर ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु आता या योजनेचा लाभ सर्वच नागरिक घेऊ शकणार आहेत. तसेच चांगली बाब म्हणजे सरकारची ही योजना जोखीममुक्त आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवलेले पैशांची हमी सरकार घेते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता फक्त 200 रुपयांमध्ये

गुंतवणूकदारांना किती मिळेल परतावा?

किसान विकास पत्र योजनेत गुंतवलेले रक्कमेवर चांगले व्याजदर देखील देण्यात येतात. तर या योजनेवर गुंतवणूकदारांना  7.5% वार्षिक चक्रवाढ व्याज मिळते.

याचमुळे गुंतवणूकदारांची रक्कम केवळ 115 महिन्यांमध्ये दुप्पट होते. या योजनेचा लाभ घेण्यासाही पात्रतेच्या अटी देखील सोप्यच आहेत.

भारतातील कोणतीही प्रौढ व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. त्याचबरोबर 10 वर्षांवरील मुले देखील आपल्या नावाने यामध्ये खाते उघडू शकता.

आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला किसान विकास पत्र योजनेतील रक्कम आधीच काढायची असेल तर तुम्ही 30 महिन्यांनी काढू शकता. त्यावेळी तुम्हाला गुंतवणूक आणि त्यावर झालेले व्याज मिळते.

परंतु जर तुम्हाला पूर्ण परतावा हवा असेल तर तुम्हाला त्यासाठी 115 महिने थांबावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

  • आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा जसे की, वीज बिल, पासपोर्ट इत्यादी.  

Leave a Comment