सध्याचे जीवनमान इतके खराब झाले आहे की, त्यामुळे लोक मोठमोठ्या आजारांना बळी पडत आहेत. सतत बाहेरच जंक फूड, तेलकट पदार्थ, औषधांची फवारणी केलेल्या भाज्या खाणे, जवळपास सर्वच हायब्रीड झाले आहे. त्यामुळे लोक तितक्याच प्रमाणात आजारी पडत आहेत. दुसरीकडे वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. आता या असे आजार आणि अपघात म्हटलं की, दवाखाना आलाच. दवाखाना तिथे लाखोंचा खर्च आलाच. यासाठीच भारत सरकारने नागरिकांसाठी एक योजना सुरू केली आहे. चला तर मग ही योजना काय आहे ते जाणून घेऊयात.

केंद्र सरकारने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘आयुष्यमान भारत योजना’ असे आहे.
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांचा आता दवाखान्यात होणारा खर्च वाचणार आहे.
फळपीक विमा 2025: अर्ज करण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा!
आता योजनेत आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक देखील घेऊ शकणार आहेत. कारण या नागरिकांसाठी आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली आहे.
आयुष्मान वय वंदना कार्ड कसे डाउनलोड करावे?
तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या आयुष्यमान वय वंदना कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
• सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर वर जाऊन आयुष्यमान ऍप डाउनलोड करावे लागेल.
• ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ऍपवर लॉग इन करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला या ऍपमध्ये लाभार्थी या पर्यायावर क्लिक करून लॉग इन करावे लागेल.
• लॉग इन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर कॅप्चा कोड येईल, ती तिथे टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो तेथे इंटर करावा लागेल.
• ऍपमध्ये लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.
• यानंतर तुम्हाला E KYC प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला otp देण्यात येईल तो टाका.
• त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडा आणि कुटुंबातील व्यक्तींची माहिती जोडा.
• सर्व माहिती जोडल्यानंतर फॉर्म तपासून सबमिट करा.
• तुमची E-kyc प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुष्मान वय वंदना कार्ड डाउनलोड करा.