शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते ती पाण्याची. कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही. दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्वाचे असलेले पाणी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकासाठी मिळत नाही. तसेच अलिकडच्या काळात पाऊस होऊनही पाण्याचे प्रमाण शेतीसाठी कमीच पडत आहे. त्यामुळे विहीर किंवा बोअरवेलला पाणी कमी असले तरी देखील शेतकरी आपल्या शेतीतील पिकाला पाणी देऊ शकणार आहेत. हे केवळ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनामुळे शक्य झाले आहे. आता याच सूक्ष्म सिंचनाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान
शेतकरी मित्रांनो विहीर, तलाव किंवा शेततळ्यात पाणी साठा कमी झाला की तुम्हाला पिकाची काळजी वाटते. पण तुम्ही जर शेती पिकाला पाटाद्वारे थेट पाणी दिले तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज भासेल.
परंतु तुम्ही जर त्याऐवजी सूक्ष्म सिंचनाचा वापर केला तर तुम्हाला पाण्याची बचत करून पिकाला हवे तेवढेच पाणी देता येईल. त्यामुळे तुम्हाला शेती करणे अधिक सुलभ होईल. मात्र, सूक्ष्म सिंचनासाठी खर्चही येतो त्यामुळे अनेक शेतकरी याकडे पाठ फिरवतात.
प्रति थेंब अधिक पिक योजना
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी योजना राबवत आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पाण्या संबंधितच्या अडचणी सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत चालवण्यात येणारी ‘प्रति थेंब अधिक पिक योजना’.
या योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान देण्यात येत आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेती पिकाला नवा बहर द्यावा. शेतकऱ्यांना हे अनुदान थेट खात्यात देण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! तत्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनांचा लाभ
सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान किती मिळते?
सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 25% ते 90% टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. ही अनुदान शेतकऱ्यांना 5 हेक्टर जमिनीच्या मर्यादेपर्यंत मिळते.
तर भूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 45% अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 25% ते 30% पूरक अनुदान मिळते.
तसेच अनुसूचित जातींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. त्यासह अनुसूचित जमातींकरता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत या अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
आवश्यक कागदपत्रे
• सातबारा उतारा व ८ अ उतारा
• आधारकार्ड, बँक पासबुक, फार्मर आयडी
• सिंचन साधनांची नोंद सातबारावर आवश्यक
• नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र गरजेचे आहे.
3 thoughts on “शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!”