Mahamesh Yojana – राज्य सरकारने सामान्य लोकांसाठी असंख्य योजना राबवलेल्या आहेत ज्याचा फायदा महिलावर्ग, शेतकरी बांधव, छोटे व्यावसायिक अश्या असंख्य लोकांना होत आहे. योजना राबविण्याचे उद्देश म्हणजे राज्यातील सामान्य जनतेला आर्थिक साह्य मिळावे म्हणून या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे मागास प्रवर्गातील लोकांचा आर्थिक विकास आणि व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ यातर्फे महामेश ही योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ फक्त भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती घेऊ शकतात इतर लोक या योजनेसाठी अपात्र राहतील.
राजे यशवंत होळकर महामेष योजना 2024 हि योजना महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हामध्ये राबवली आहे. या योजनेचा लाभ घ्यायचं असेल तर Mahamesh या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज भरावा
योजनेसाठी पात्रअसलेल्या लोकांना राज्य सरकार महामेष योजनेअंतर्गत कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणार आहे.
महामेश योजनेचा उद्देश | Mahamesh Yojana
1)महाराष्ट्र राज्यामध्ये अर्धबंधिस्त व बंदिस्त मेंढीपालन व्यवसायास चालना देणे.
2) बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
3) मागास आणि धनगर समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
4) मेंढ्या आणि शेळ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करणे.
5) मांसाहार वाढल्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी व्यवसाय निर्माण करणे.
शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
महामेश योजनेच्या अटी | Mahamesh Yojana Eligibility
1) या योजनेसाठी केवळ भटक्या जमाती (भज-क), आणि धनगर प्रवर्गातील लोक पात्र राहतील इतर लोक अपात्र राहतील.
2) योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 ते 60 असावे.
3) महिला वर्गासाठी महामेश योजनेत 30 टक्के अनुदान राहील.
4) अपंग व्यक्ती यांना 3 टक्के आरक्षण देण्यात येईल.
5) आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याला लिंक असणे आवश्यक.