शेती करायचं म्हटलं की सर्वात आधी गरज भासते ती पाण्याची. पिकाला जर मुबलक प्रमाणात पाणी मिळाले तरच ते पिक बहरते. अन्यथा पिकाची लागवड करून काहीच फायदा होत नाही. त्याचबरोबर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्याच्या कृषी योजना राबवत आहे. आता जर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी साठा कमी पडत असेल तर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात येत आहे. याबाबतच महत्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
राज्यात शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2025- 2026’ राबवली जात आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी लाभ दिला जातो. जेणेकरून शेतकरी पावसाच्या दिवसांत शेतीसाठी पाण्याचा साठा करू शकतात.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला पाण्याची कमतरता भासत नाही. तसेच या योजनेंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज दाखल केले आहे, अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
वैयक्तिक शेततळ्याबाबत महत्वाची अपडेट
वैयक्तिक शेततळ्यासाठी 2025 मध्ये शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. अशा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत माहिती समोर आली आहे. तर आता त्या शेतकऱ्यांची 2025 मध्ये झालेली निवड ही 2026 पर्यंत वैद्य राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच महाडीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच यानुसार राज्यातील 13 हजार 226 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत या योजनेसाठी 3 हजार 545 शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत.
शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
शेतकऱ्यांची नावे होऊ शकतात रद्द
तसं पाहायला गेलं तर, आता पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे पावसाच्या दिवसांत शेततळे खोदणे अवघड आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जरी शेतकरी इच्छुक असले तरी देखील योजनेसंबंधीची कागदपत्रे अपलोड करण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. निवड झालेल्या ज्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे अपलोड नाही केली तर त्यांचे नाव या योजनेतून रद्द करण्यात येणारा आहे.
2 thoughts on “Maha DBT Scheme – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट”