राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारकडून काही आर्थिक हातभार लागेल. याच कृषी योजनांपैकी एक असलेल्या योजनेबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना राबवत आहे. या पोर्टलवरील योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतो. आता आपण ‘सौरचलित फवारणी पंप योजने’बाबत जाणून घेऊयात.

सौरचलित फवारणी पंप योजना
शेतकऱ्यांना शेती पिकावर फवारणी करण्यासाठी फवारणी पंपाची गरज भासते. परंतु आताच्या आधुनिक युगात पिक फवारणीसाठी सौरचलित फवारणी पंपाची निर्मिती करण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी हात पंपासारखे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तर याच सौरचलित फवारणी पंपासाठी सरकारकडून अनुदान मिळत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा.
शेतकऱ्यांना कसा मिळेल लाभ?
महा DBT पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी ‘सौरचलित फवारणी पंप योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सौर पंप खरेदीसाठी 70 ते 100 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. या योजनेतच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात.
कारण या योजनेसाठी सरकारने विशिष्ट अटी ठेवल्या आहेत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या वर्गवारी तसेच शेतकऱ्यांच्या जमीनधारकतेची स्थिती, वयोमर्यादा आणि इतरही निकषांवर तपासले जाणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेट
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या चालू बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य आहे. कारण महा DBT पोर्टलवरील योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येतो.
सौरचलित फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
सौरचलित फवारणी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. ती खालीलप्रमाणे:-
- फार्मर आयडी
- आधार कार्ड
- शेतीचा सातबारा / मालमत्ता दस्त
- बँक पासबुक (IFSC कोडसहित, आधार संलग्न असणे अनिवार्य)