अरे देवा..! ‘या’ शेतकऱ्यांचे नाव काळया यादीत होणार समाविष्ट आणि पुढचे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे.  शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात येणारी पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने यामध्ये काही बदल केले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना नव्या नियमानुसार या योजनेचा लाभ घ्यावा लागणार आहे. तसेच यामध्ये काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. चला तर मग सरकारने या योजनेत नेमका काय बदल केला आहे.

farmer list not eligible for sarkari yojana

पंतप्रधान पिक विमा योजनेत मोठा बदल

पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सरकार यंदाच्या वर्षापासून काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक या योजनेत आपला सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

सरकारने आपल्या पिकाची ई पिक पाहणी म्हणजे अगदी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.

जर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या पिकाची आणि प्रत्यक्ष पिक विमा काढलेल्या क्षेत्राच्या माहितीमध्ये तफावत आढळल्यास सादर शेतकऱ्याचा पिक विमा रद्द करण्यात येणार आहे.

पुढील पाच वर्षे योजनांचा मिळणार नाही लाभ

जर शेतकऱ्यांच्या माहितीबाबत काही तफावत आढळल्यास, तर त्या शेतकऱ्याला पुढची पाच वर्षे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

तसेच सरकारने पीक पाहणी साठी डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपवरील नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक आपल्या पिकाची ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा १.२५ लाखांचे अनुदान – जाणून घ्या संपूर्ण माहिती

पिक विमा होणार रद्द आणि काळया यादीत नाव समाविष्ट

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत जर पिकाची ई पिक पाहणी व्यवस्थित केली नाही आणि माहितीमध्ये बनावट आढळल्यास शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द होणार आहे.

सदर शेतकऱ्याला पुढची पाच वर्षे काळया यादीत टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऍग्रीस्टॅक क्रमांक देणे देखील बंधनकारक करण्यात आला आहे. 

2 thoughts on “अरे देवा..! ‘या’ शेतकऱ्यांचे नाव काळया यादीत होणार समाविष्ट आणि पुढचे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभ”

Leave a Comment