भाडेकरूही घराच्या छतावर मोफत सोलर पॅनल बसवू शकतात का? योजनेसाठी असा करा अर्ज; नियम काय सांगतो?

सौर घर योजना या योजनेअंतर्गत छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 1 कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी तब्बल 75,021 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून मुळ खर्चाच्या 40% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील? किंवा अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून मिळवणार आहोत.

भाडेकरू या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?

प्रधानमंत्री सूर्य योजनेंतर्गत घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी  केंद्र शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये विविध वॅट्सचे सोलर पॅनल च्या अनुषंगाने अर्जदारांना  अनुदान दिले जाते. परंतु मुख्य प्रश्नाचे उत्तर म्हणजे भाडेकरूंना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, योजनेसाठी अर्ज करण्यासाठी  अर्जदाराकडे स्वतःचे घर आणि स्वतःचे वीज कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्तींच्या नावावर वीज कनेक्शन आहे तीच व्यक्ती प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत अनुदान मिळवू  शकतात. Pm Suryaghar Yojana  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

असा करा अर्ज?

प्रधानमंत्री  सूर्य घर  योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज करताना पुढील प्रक्रियेचा तुम्ही वापर करु शकता. आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

·      प्रधानमंत्री सुर्य घर योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://www.pmsuryaghar.gov.in/ या लिंकवर क्लिक करुनसुद्धा तुम्ही वेबसाईटला भेट देऊ शकता.   

·      सर्वप्रथम वेबसाईटवर तुमच्या नावावने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.  Login Here या पर्याया वर क्लिक करुन तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकता.

·      तुमचा Registered Mobile नंबर टाका आणि Next बटनावर क्लिक करा.

·      येथे आता Apply For Rooftop Solar Installation चा फॉर्म भरावा लागेल.

·      या फॉर्ममध्ये Application Details मध्ये  तुमची माहिती भरा.

·      त्यानंतर काही विचारण्यात आलेले Documents Upload करा.

·      आता भरलेला फार्म  तपासून फॉर्म  Final Submit करा.

·      यानंतर तुमचा फॉर्म Inspection साठी जाईल तो Approved झाल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

जर तुम्हाला योजनेशी संबंधित कोणतीही अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही 1800-180-3333 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा हा टोल फ्री क्रमांक असून 24 तासात कधीही कॉल करुन माहिती मिळवू शकता. Pm Suryaghar Yojana  

खूप जास्त वीज बिल येण्याचे कारण

महाराष्ट्रात ग्रामिण भागात महावितरण ही शासकीय कंपनी वीजपुरवठा करते. घरात फ्रिज, एसी, कुलर, जास्त काळ वापरला गेल्यास खूप जास्त विजेचे बिल वापरकर्त्यांना भरावे लागते. अनेकदा तर लोडशेडिंगमुळे ठराविक दिवशी ग्रामिण भागात पूर्ण दिवस लाईट नसते. अशावेळी खूप जास्त त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो.  म्हणजेच विजेची बचत करण्यासाठी लोक आता त्यांच्या घरावर सौर पॅनेल बसवू लागले आहे. हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे पॉवर ग्रिडच्या वीजपुरवठ्यावर. घराच्या छतावर सोलर पॅनल बसविल्यानंतर  वीजेचा भरपूर वापर केला

Leave a Comment