लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर ! पहा तुमचे नाव आहेका यादीत.

पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. त्यानंतर 1 जुलै 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आता लाभार्थी महिलांची यादी जिल्हानिहाय जाहीर करण्यात येत आहे. चला तर मग पाहूया कोणत्या जिल्हाच्या लाभार्थ्यांची यादी सर्वप्रथम जाहीर करण्यात आली आहे. आणि तुम्ही त्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर पात्र यादीत तुमचे नाव आहे का ते देखील तुम्हाला तपासता येईल.

अर्जांची छाननी प्रक्रिया निकष

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी महाराष्ट्रातून तब्बल दिड कोटी महिलांनी आतापर्यंत अर्ज दाखल केले आहेत. अर्जांच्या छाननी मध्ये केवळ 50 लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्यात आलेल्या अनेक अर्जांमध्ये त्रुटी दिसून आल्या आहेत. काही महत्त्वाची कागदपत्रे जोडली गेलेली नाहीत तसेच उत्पन्नाचा दाखला देखील जोडला गेलेला नाही. त्यामुळे अर्जांच्या छाननीमध्ये काही अर्ज बाद करण्यात आले आहेत. अर्ज छाननीची प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. कारण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 ठरविण्यात आली आहे.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी

https://dhulecorporation.org/mr/chief-minister-my-beloved-sister-beneficiary-list/ सध्या धुळे जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची यादी जाहिर करण्यात आली आहे. तुम्ही धुळे जिल्ह्यात राहणारे असाल आणि तुमच्या कुटुंबातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करुन लाभार्थ्यांच्या यादीत तुमच्या परिचित व्याक्तीचे नाव तपासू शकता.

पात्र न ठरलेल्या महिला अर्जदारांसाठी

महाराष्ट्र शासानाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी अर्ज मागवले आणि अनेकांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज केले देखील. सेतू केंद्र, अंगणवाडी सेविका, आपले सरकार केंद्र आणि नारीशक्ती दूत ऍप या प्रत्येक ठिकाणावरुन अर्ज करण्याची सोय शासनाने करुन दिली होती. तुम्ही योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि तुम्ही पात्र आहात की नाही याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र किंवा जर का तुम्ही नारीशक्ती ऍपच्या माध्यमातून अर्ज केला असल्यास तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर केला गेला आहे की नाही याबद्दल माहिती मिळेल. तम्ही पात्र असाल तर 15 ऑगस्ट 2024 च्या आधी तुमच्या खात्यात योजनेची रक्कम जमा होईल परंतु तुम्ही पात्र नसाल तर छाननीच्या वेळी योजनेतील अधिकाऱ्यांना तुमच्या अर्जात काही त्रुटी दिसून आल्या असतील किंवा महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे तुमच्याकडून राहिले असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासून छाननी दरम्यान दिलेली सूचना देखील तपासा. काही त्रुटी असल्यास तत्काळ प्रक्रिया पूर्ण करा. जेणेकरुन तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकाल.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची आणि अर्ज छाननीची देखील 31 ऑगस्ट 2024  ही तारीख अंतिम ठरविण्यात आली आहे. त्यामुळे घाई करा आणि तुम्ही अर्ज केला असल्यास त्याचे स्टेटस जरुर तपासा.

Leave a Comment