आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड. कारण रेशन कार्डचा वापर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी होतो. तसेच रेशन कार्ड वर आपल्याला स्वस्त अन्नधान्य मिळतात. त्याचबरोबर रेशन कार्डमुळे तुमच्या आर्थिक उत्पन्न किती आहे हेही समजते. रेशन कार्डामुळे कुटुंबात किती व्यक्ती आहेत याचीही माहिती मिळते. प्रत्येक गोष्टीसाठी रेशन कार्ड हे लागतेच. परंतु आता तुम्हाला यापुढेही रेशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला रेशन कार्डमध्ये नवीन आलेले अपडेट पूर्ण करावे लागेल. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद पडू शकते. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आता कुठलेही शासकीय काम करायचं म्हटलं की, केवायसी हे बंधनकारक करण्यात आली आहे. या ई केवायसीमुळे कागदपत्रांबाबत होणारे गैरवापर टळत आहेत. मग तुमच्या आधार कार्ड असो किंवा बँक खाते तुम्हाला केवायसी ही करावीच लागते. अशातच आता सरकारने रेशन कार्डची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता रेशन कार्डमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीने रेशन कार्ड सोबत ई केवायसी करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या व्यक्तीची रेशन कार्डची ई केवायसी प्रक्रिया केली नाही, तर संबंधित व्यक्तीचे धान्य मिळणे बंद होणार आहे. यासाठी सरकारकडून नागरिकांना लवकरात लवकर ई केवायसी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कशी करावी रेशन कार्डची ई केवायसी प्रक्रिया?
रेशन कार्डसोबत केवायसी म्हणजे कुटुंबात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड रेशन कार्डला संलग्न करणे होय. तुम्हाला रेशन कार्डची ई केवायसी करायची असेल तर काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर मग या सोप्या स्टेटस काय आहे ते पाहूयात.
तुम्ही तुमच्या रेशन दुकानात जाऊनही तुमच्या रेशन कार्ड ची ई केवायसी करू शकता. रेशन दुकानदाराकडे असलेल्या फोर-जी ईपॉस मशीनद्वारे केवायसी केली जाते. तेथे तुम्हाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड लागेल, कारण त्याचा नंबर टाकावा लागेल. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे बोटाचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जातील. नंतर तुमची ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.
मेरा राशन ॲप वर ई केवायसी
तुम्हाला जर मेरा राशन ॲप वर जाऊन ई केवायसी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जावे लागेल. प्ले स्टोअर वर गेल्यानंतर मेरा राशन ॲप डाऊनलोड करावे लागेल.
यानंतर तुम्हाला ते ॲप सुरू करून तेथे रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाकण्याचा पर्याय दिसेल. तेथे हा नंबर टाकून घ्यावा.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला आधार सिडींग या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे Yes आणि No दिसेल. याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीच्या समोर yes असा ऑप्शन आहे त्या व्यक्तीला आधार शेडिंग करण्याची गरज नाही. तसेच ज्या व्यक्तीच्या समोर no असा पर्याय असेल त्या सदस्याला ई केवायसी करावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी अन्न पुरवठा या विभागाच्या अधिकृत ऑनलाइन वेबसाईटला भेट द्यावी लागेल