आता सावकारकी कर्ज करा बंद, राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी सुरू केली कृषी तारण कर्ज योजना, जाणून घ्या सविस्तर.

आजच्या युगात शेती आणि जमिनीला मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झाले आहे यातच “सोने पे सुहागा” म्हणजे शेती आणि शेतकरी वर्गासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करताना दिसत आहे. राज्य सरकारने शेतकरी वर्गासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्यातून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होत आहे. सध्या च्या काळात शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत तर मित्रानो आज आपण या लेखात कृषी तारण कर्ज योजना काय आहे या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

कृषी तारण कर्ज योजना:-

पिकांच्या कापणीच्या हंगामात बाजारात विशिष्ट मालाची फार कमी वेळात मोठी आवक निर्माण होते होते, ज्यामुळे त्या वस्तूच्या बाजारभावात मोठी घसरण होते. याचाच फायदा व्यापारी वर्ग घेतो आणि कवडीमोल किमतीत शेतकरी वर्गाकडून माल विकत घेत असतो अश्या प्रकारे शेतकरी वर्गाची पिळवणूक होते. याला आळा घालण्यासाठी सरकारने कृषी तारण कर्ज योजना राबवली आहे. या कृषी तारण कर्ज योजनेंतर्गत शेतकरी आपले उत्पादन APMC गोदामात ठेवतो, त्याच्या मोबदल्यात त्याला ७५% रक्कम ही कर्ज म्हणून मिळत असते. आणि जेव्हा बाजारात शेतमालाच्या किमती वाढतील तेव्हा शेतकरी गोदामातील माल विकून घेतलेले कर्ज फेडतो. याचा फायदा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये गोदामात साठवून ठेवलेल्या मालाची देखरेख आणि सुरक्षिततेची जबाबदारी ही बाजार समिती घेते.

योजनेची रचना आणि अंमलबजावणी:-

सन 1990 पासून राज्यात MSAAMB अंतर्गत शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी कृषी तारण कर्ज ही योजना राबवली जात आहे. यामध्ये मूग, तूर, उडीद, सोयाबीन, धान, सूर्यफूल, करडई, हरभरा (चना), ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा (राजमा), हळद, बेदाणा (बेदाणा) या पिकांसाठी तारण कर्जाची योजना उपलब्ध आहे. 

कृषी तारण कर्ज योजनेत व्याजदर कसा असेल:-

कृषी तारण कर्ज योजनेंतर्गत, शेतकऱ्याला बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या मूल्याच्या 75% पर्यंत, 6% व्याज दराने कृषी तारण कर्ज मिळते. शेतकऱ्याला 180 दिवसांच्या कालावधीपर्यंत या सुविधेचा लाभ घेण्याची मुभा आहे. 180 दिवसांच्या आत परतफेड करणाऱ्या एपीएमसींना प्रोत्साहनात्मक प्रोत्साहन म्हणून व्याजावर 3% ची सूट दिली जाते. म्हणजे अवघे 3 टक्के व्याजदर शेतकरी वर्गाला द्यावा लागणार आहे. जर शेतकरी वर्गाला 180 दिवसांनंतर पुढील 6 महिन्यांसाठी 8% एवढा व्याजदर असेल व पुढील 6 महिन्यांसाठी 12% एवढा व्याजदर असेल. योग्य वेळेत परतावा केल्यास शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होणार आहे.

योजनेच्या प्रमुख अटी:-

1) कृषी तारण कर्ज योजनेचा फायदा केवळ शेतकरी वर्गासाठी राहील, व्यापारी वर्ग या योजनेसाठी अपात्र असेल.

2) शेतमालाची किंमत त्या दिवसाच्या बाजारभावावर किंवा MSP यापैकी जे कमी असेल त्यावरून केली जाईल.

3) कर्जाची परतफेड ही 180 दिवसात करावी शक्य नसल्यास 180 दिवसानंतर 6 टक्के व्याजदर लागू करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top