आता अशाच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप 2024 मध्ये नैसर्गिक हानी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता शेतकऱ्यांसाठी याच नुकसानीपोटी भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हानिहाय यादी प्रसारित करण्यात आली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 3178 कोटी रुपये मंजूर
तर शेतकऱ्यांनो राज्यात खरीप 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. पण आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नुकसानीपोटी तब्बल 3178 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता या नुकसान भरपाईची जिल्हानिहाय यादी प्रसारित करण्यात आली आहे.
मदत मंजूर झालेले जिल्हे
नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर विभागातील शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत होते. आता या शेतकऱ्यांना 3178 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामधील 1620 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, तर 1558 कोटी रुपयांची वाटप सुरू आहे, याबाबतची माहिती प्रशासनाने दिली आहे. मदत मंजूर झालेल्या विभागाची आणि जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे पाहा.
विभागानुसार मंजूर झालेली रक्कम
- नागपूर विभाग: 20 लाख 988 रुपये (वर्धा ,नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर)
- पुणे विभाग: 28 लाख 299 रुपये (अहिल्यानगर, सोलापूर)
- कोल्हापूर विभाग: 15 लाख रुपये (सातारा, सांगली)
- छत्रपती संभाजीनगर विभाग: 56 लाख 418 रुपये (जालना, बीड)
- लातूर विभाग: 62 लाख रुपये (धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड)
- अमरावती विभाग: 62 लाख रुपये ( बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ)