सध्याचे जग हे डिजिटल होत चालले आहे. कारण डिजिटल जगतामुळे फसवणुकीला आळा बसला आहे आणि कामे देखील जलद गतीने होत आहेत. सरकार आता शेती क्षेत्रात देखील डिजिटल क्रांती घडवत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी ऍग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांची व जमिनीची माहिती मिळणे सोपे होत आहे.

फार्मर आयडीचा फायदा काय?
सरकारने सुरू केलेल्या ऍग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांची आधार संलग्न असलेली माहिती म्हणजेच शेती व शेतीतील हंगामी पिकांचा संच तसेच शेताचे भू संदर्भीकृत याची माहिती एकत्रित मिळते. या सर्व माहितीचा एक संच बनवून महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची व शेताची माहिती घेऊन शेतकऱ्यांचा आधार नंबर संलग्न करून त्यांना एक ‘फार्मर आयडी’ देण्यात येतो. या फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ घेणे सोपे होते. आता तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून अगदी घरबसल्या फार्मर आयडी काढू शकता. चला तर मग हे फार्मर आयडी कसे काढतात ते पाहुयात.
घरबसल्या फार्मर आयडी कसा काढावा?
- सर्वप्रथम तुम्हाला https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ फार्मर नोंदणी करण्यासाठी या वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर ही वेबसाईट ओपन होईल, तेथे तुम्हाला farmer असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे. .
- त्यानंतर तुम्हाला Create new user account या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यांनंतर तुम्हाला Aadhar E-kyc पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या आधार संलग्न मोबाईलवर OTP येईल तो टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला verify वर क्लिक करावे लागेल.
- त्यांनंतर तुमच्यासमोर शेतकऱ्याची सर्व माहिती ओपन होईल, तेथे Agristack Portal ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
- OTP आल्यानंतर तो टाकून Verification करून घ्या आणि Agristack Profile Password सेट करा. त्यानंतर Set Password Confirm Password करा.
- यानंतर Create My Account पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे रजिस्ट्रेशन होईल आणि तुमची प्रोफाईल तयार होईल. यानंतर Ok पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर टाकून पुन्हा login करा. त्यानंतर रजिस्टर As Farmer पर्यायावर क्लिक करा. तुमचा Mobile Confirmation करा.
- यानंतर तुमच्यासमोर Farmer ID Form ओपन होईल. त्यानंतर Farmer Details मध्ये तुमची सर्व माहिती भरावी आणि त्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी मिळेल.
- अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या फार्मर आयडी काढू शकता.