कुक्कटपालनासाठी कोंबडीची नवी प्रजात विकसित; गिरीराज कोंबडीपेक्षाही जास्त देते अंडी | Swarndhara Kombdi

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. परंतु केवळ शेती व्यवसाय करण्यापेक्षा त्याला जोडधंदा केला तर जास्त फायद्याचे ठरते. तर शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry Business) हा फायदेशीर ठरतो. आज आम्ही तुम्हाला याच कुक्कुटपालच्या व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. तसेच आता कुक्कुटपालनात कोणत्या कोंबडीची अधिक मागणी आहे, याची देखील माहिती देणार आहोत. चला तर मग भरघोस नफा देणाऱ्या कोंबडीच्या प्रजातीबद्दल जाणून घेऊयात.

swarnadhara hen

कुक्कटपालनासाठी फायदेशीर कोंबडीची प्रजात

अलीकडच्या काळात कुक्कुटपालनासाठी गिरीराज कोंबडीला विशेष मागणी होती. या कोंबडीमुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा नफा झाला आहे. त्यानंतर आता बाजारात ‘स्वर्णधारा’ (Swarndhara Kombdi) या कोंबडीला विशेष मागणी आहे. ही कोंबडीची प्रजात अंडी आणि मांसासाठी पाळली जात आहे. या कोंबडीची प्रजात कर्नाटक पशुविज्ञान विद्यापीठाकडून (Karnataka University of Animal Science) विकसित करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाजारात मागील काळात कडकनाथ कोंबडीला देखील मोठी मागणी होती. कडकनाथ कोंबडीचे मांस हे खाण्यासाठी खूप चांगले मानले जाते. कडकनाथ जातीच्या कोंबडीचे मांस हे थोडे रंगाला काळपट असते. परंतु ते खूप पौष्टिक मानले जाते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

‘स्वर्णधारा’ कोंबडीची वैशिष्ट्ये काय आहेत?

शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढवून आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी ‘स्वर्णधारा’ कोंबडी अतिशय उपयुक्त आहे. या कोंबडीच्या अंड्याचा रंग हा तपकिरी असतो. तर अंड्याचे वजन हे 55 ते 60 ग्रॅम असते. तसेच स्वर्णधारा कोंबडीच्या एक दिवसाच्या पिलाचे वजन हे 35 ते 40 ग्रॅम असते. तर जवळपास 22 ते 23 आठवड्यामध्ये या कोंबडीचे पिल्लू लैंगिक परिपक्वतेमध्ये येते. त्याचबरोबर या पिलांचे वजन हे गिरिराजा जातीपेक्षा कमी असते. तसेच या कोंबडीच्या अंडी उबवणुकीतील सफल प्रमाण 80 ते 85 टक्के एवढे आहे. स्वर्णधारा कोंबडी एक वर्षात 180 ते 190 अंडी देते. त्यामुळे कुक्कटपालनासाठी एकदम परिपूर्ण अशी ही कोंबडीची प्रजात आहे. 

Leave a Comment