बँकांमध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? सरकार त्याबाबत गॅरंटी देते का?  जाणून घ्या काय आहेत नियम

नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. आपण आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी बँकेत ठेवतो. परंतु बँकच डबघाईला गेली तर आपले पैसे आपल्याला कसे मिळतील? याबाबत तुम्ही विचार केला आहे का? आणि तुम्ही पैसे गुंतवलेली बँक डिफॉल्ट झाली तर त्याबाबत RBI चे नेमके काय नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ अधिक सोप्या भाषेत.

बँक डिफॉल्ट झाल्यास काय होते?

आपण पैसे गुंतवलेली बँक  डिफॉल्ट झाल्यास काय? असे अनेकांना प्रश्न पडला असेल. एखादी बँक डिफॉल्ट झाल्यास गुंतवणूकदारांच्या फक्त 5 लाखापर्यंतच्या रुपयांच्या ठेवी सुरक्षित राहतात. याचे कारण म्हणजे Deposit Insurance and Credit Guarantee Corporation ही संस्था कोणत्याही बँकेच्या 5 लाखापर्यंतच्या बँक ठेवींवर विमा गॅरंटी देते. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मालकीची उपकंपनी आहे. जी भारतातील  बँकाचा विमा उतरवते. या विम्याचे पैसे ग्राहकांकडून घेतले जात नाहीत. यासाठी DICGC ही संस्था ग्राहकाने ज्या बँकेत पैसे गुंतवले आहेत त्या बँकेकडून प्रिमियम जमा केला जातो.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

भारतातील परदेशी बँकांनाही हाच नियम लागू

भारतात एचएसबीसी इंडिया लिमिटेड, सिटी बँक, ड्यूश बँक, स्कॉटलंडची रॉयल बँक, DBS आर्थिक, बँक ऑफ अमेरिका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक अशा एक नाही तब्बल 50 हून जास्त परदेशी बँका कार्यरत आहेत त्यांच्या 300 हून जास्त शाखा भारतातील विविध शहरांमध्ये आहेत. ग्राहकांच्या गुंतवणूकीबद्दलचा वरील नियम या परदेशी बँकांना देखील लागू होतो. केवळ सहकारी बँका या नियमांमध्ये बसत नाहीत. त्याची कारणे वेगळी आहेत.

बँक बंद पडल्यास किती दिवसांत मिळेल रक्कम

एखाद्या बँकेत तुम्ही गुंतवणूक केली किंवा बचत खाते असेल आणि कालांतराने ती बँक बंद पडली किंवा डबघाईला गेली असेल तर Deposit Insurance and Credit Guarantee Corporation या संस्थेच्या नियमाप्रमाणे 5 लाख रुपयांपर्यंत रक्कमेचा विमा असल्याने गुंतवणूक दाराला ही रक्कम 90 दिवसांच्या आत दिली जाते. कारण एखादी बँक बंद पडल्यास त्या बँकेतील ग्राहकांची सर्व माहिती गोळा करण्यास DICGC ला 45 दिवस लागतात आणि माहितीची तपासणी करुन ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रास्फर करण्याची प्रक्रिया 45 दिवसात होते. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेला 90 दिवस म्हणजेच 3 महिने लागतात.

Leave a Comment