केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. तसेच महिलांच्या बचतीसाठी देशाच्या बजेटमध्ये देखील विचार केला जातो. महिल बचतीतून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. तसेच आपले भविष्य उज्वल करू शकतात. यासाठी देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023- 24 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी एक बचत योजना आणली होती. या बचत योजनेमध्ये इतर योजनांपेक्षा अधिक व्याजदर महिलांना दिले जात होते. परंतु महिलांसाठी आणलेली ही योजना आता सरकारकडून बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांच्या बचतीचा विचार करून त्यांना अधिक व्याजदर मिळणारी योजना 2023-24 च्या बजेटमध्ये मांडली होती. या योजनेचे नाव ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ असे आहे. सरकारद्वारे ही योजना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत दोन वर्षांसाठी सुरू करण्यात आली होती. यामुळे आता 2025 च्या पुढे ही योजना सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु महिलांना या योजनेचा जबरदस्त फायदा होत होता. पण आता ही योजना बंद होणार असल्यामुळे महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त होऊ शकते.
सर्वाधिक व्याजदर देणारी योजना
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेतून महिलांना इतर योजनांपेक्षा आधीचे व्याजदर मिळते. म्हणजेच या योजनेत महिलांना 7.5% असे अधिक आकर्षक व्याजदर मिळतात. या योजनेचा लाभ महिला किंवा मुलगी घेऊ शकते. या योजनेमध्ये दोन लाख रुपयांची रक्कम दोन वर्षांसाठी ठेवण्यात येते. सरकारने ही योजना केवळ दोन वर्षांसाठीच आणली होती. त्यामुळे ही योजना 2023 ते 2025 पर्यंतच लागू राहणार आहे. ही योजना पुढे चालवण्याबाबत सरकारकडून अद्याप काहीही संकेत आलेले नाहीत.
योजना बंद होऊ शकते
एका सरकारी अधिकाऱ्याने रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की सरकार लवकरच ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ ही योजना बंद करू शकते. परंतु नागरिकांकडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजना या योजनांना चांगला प्रतिसाद देण्यात येत आहे. नागरिक यामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करत आहेत. परंतु महिलांना सर्वाधिक व्याजदर देणारी दोन वर्षांपर्यंत कार्यकाळ असणारी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना’ बंद होऊ शकते.