Pink E-Rickshaw Yojana – जर तुम्ही महाराष्ट्रातील महिला असाल जिच्याकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही किंवा स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल किंवा तुम्हाला तुमचे कुटुंब चालवण्यासाठी काही रोजगारात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्टरातील सरकारने महिलांसाठी एक उत्तम योजना आखली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना. महाराष्ट्र पिंक ई रिक्शा योजना 2024 पहिल्यांदा या योजनेला फक्त 10 शहरामध्ये चालू करणार आहेत. नंतर हळू हळू पूर्ण महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात येईल जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील माहिती पूर्ण प्रमाणे वाचा.

महाराष्ट्र Pink E-Rickshaw Yojana काय आहे
महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे सर्व बेरोजगार महिलांना गुलाबी ई-रिक्षा खरेदीवर 20% पर्यंत सबसिडी दिली जाईल. यासोबतच ई-रिक्षाच्या किमतीच्या 70% रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून दिली जाईल. अशाप्रकारे, महिलांना योजनेच्या खर्चाच्या केवळ 10% रक्कम स्वतःच्या वतीने भरावी लागेल. ही योजना महिलांना स्वतःचे कामाचे साधन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करेल.
पहिल्यानंदा फक्त 10 शहरांमध्ये 5000 पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या 10 शहरांमध्ये नवी मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, मुंबई शहर, ठाणे, मुंबई उपनगरे, नागपूर, पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश आहे. या शहरांतील कोणतीही महिला योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभ घेऊ शकते. महिलांनी रिक्षा चालवण्याची कल्पना नवीन नाही, याआधी लखनऊ आणि सुरत या दोन शहरांमध्ये याचा वापर करण्यात आला होता.या योजनेमुळे महिलांना केवळ रोजगाराशी जोडले जाणार नाही तर महाराष्ट्रासारख्या घनदाट राज्यात महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होईल.
महाराष्ट्र Pink E-Rickshaw योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
1)गुलाबी ई-रिक्षा योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार.
2)योजनेच्या पहिल्या टप्प्यात 10 प्रमुख शहरांसाठी केवळ 5000 रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
3)कोणत्याही पात्र महिलेला रिक्षा खरेदी करण्यासाठी एकूण खर्चाच्या केवळ 10% रुपये खर्च करावे लागतील.
4)सरकारने योजनेअंतर्गत 20% अनुदान आणि 70% बँक कर्ज देण्याची घोषणा केली आहे.
5)पिंक ई-रिक्षा हे इलेक्ट्रिक वाहन आहे जे पर्यावरण प्रदूषण रोखण्यास मदत करेल.
6)महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी ही योजना जाहीर केली आहे. लवकरच ही योजना चालू करण्यात येईल.
Pink E-Rickshaw योजनेसाठी पात्रता
1)महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
2)या योजनेसाठी केवळ बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच पात्र असतील.
3)या योजनेत फक्त महिलाच अर्ज करू शकतात पुरुष नाही.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Pink E-Rickshaw Documents
1)आधार कार्ड
2)रहिवासी दाखला
3)उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड
4)बँक पासबुक
5)पासपोर्ट आकाराचा फोटो