आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलावा? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स | Aadhar Card Mobile Number Change

सध्याच्या युगात सर्वकाही डिजिटल झाले आहे. त्यामुळे सर्व कामे जलद गतीने होत आहेत. त्याचप्रमाणे आता कागदपत्रे देखील ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येतात. त्यामुळे ती देखील आपल्या मोबाईलमध्ये ठेवावी लागतात. तसेच सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं कागदपत्र बनलं आहे. याशिवाय तुमचं कोणतंही काम अडू शकते. तसेच आता सर्वकाही ऑनलाईन असल्याने तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे बंधनकारक आहे. परंतु हाच नंबर काहीवेळ काही अडचणीमुळे बदलावा लागतो. पण तो कसा बदलायचा असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलायच्या याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

aadhar mobile link

आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक

आधार कार्डशिवाय कोणताही खाजगी किंवा सरकारी काम होणे शक्य नाही. जिथे तिथे सर्वप्रथम आधार कार्डची मागणी केली जाते. तुमची प्रथम ओळख म्हणून आधार कार्ड मागितले जाते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तर आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे तुमच्या आधार कार्डला बँक, मोबाईल आणि सरकारी योजनेची माहिती जोडली जाते. ज्याचं कारण म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येत असतो. या OTP ला वन टाइम पासवर्ड असे म्हणतात.

तसेच हा OTP पडताळणीसाठी येतो आणि त्यामुळे तुम्हाला सहज ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी प्रवेश मिळतो. मात्र तुम्ही जर अद्याप तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही.  त्यामुळे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक आहे.

आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला udai च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. त्यासाठी या वेबसाइट वर “https://www.uidai.gov.in/” क्लिक करा.
  • तुम्हाला जर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर नवीन मोबाईल नंबर इंटर करा.
  • आता तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP तेथे टाकून घ्या.
  • त्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट असा ऑप्शन दिसेल.
    त्यावर विचारलेली आवश्यक माहिती आणि मोबाईल नंबर इंटर करा.
  • तेथे दिलेला कॅप्चा कोड व्यवस्थित टाका. नवीन मोबाईल वर आलेला OTP टाका.
    यानंतर तुमची पडताळणी व्यवस्थित पूर्ण होईल.
  • त्यानंतर तुम्ही सेव्ह करा आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्ही वर सांगितलेल्या स्टेप्स योग्य रित्या फॉलो केल्यानंतर तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच विहित शुल्क भरण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे द्यावे लागू शकते. अशाप्रकारे तुम्ही सहज आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट करू शकता. 

Leave a Comment