शेतकऱ्यांना सरसकट मिळणार कर्जमाफी ? लगेच जाणून घ्या

शेतकऱ्यांना शेती करताना भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात. तेव्हा कुठे त्यांचे पिक हाताशी येते. पण हे पैसे खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. कर्ज काढल्यानंतर कधी कधी पिकाला भाव मिळत नाही तर कधी हाताशी आलेले पिक नैसर्गिक आपत्तीमुळे जाते. याच पर्वशभूमीवर शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी दिली जाते. कारण शेतकऱ्यांना तेवढे कर्ज भरणे शक्यच नसते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ठराव करण्यात आला आहे. चला तर मग या ठरावाबाबत सविस्त्र माहिती जाणून घेऊयात.

Loan Waiver Farmer News

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठराव

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी अहिल्यानगरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट करण्याचा ठराव करण्यात आला आहे. हे अधिवेशन अहिल्यानगर येथे शनिवारी 14 जुलै रोजी झाले आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

अधिवेशनात हा ठराव मांडला खरा परंतु या अधिवेशनात भाजप आणि सरकारवर नेत्यांकडून प्रचंड टीकास्त्र सोडण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांसाठी पिक विम्याच्या हप्त्याबाबत मोठी बातमी!

कोणकोणते ठराव करण्यात आले?

अहिल्यानगर येथे झालेल्या या ठरावात वेगवेगळे ठराव करण्यात आले आहे. या ठरावात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शास्त्रांत शेतमालाला किमान हमीभाव मिळावा याबाबतचा कायदा लागू करावा त्याचबरोबर नवीन कामगार संहिता देखील रद्द करण्यात यावी आणि अल्पसंख्यांक असलेल्या समाजावर उघडपणे सुरू असलेल्या दहशतीला पायबंद घालावी तसेच मॉललिचिंग प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, याबाबतचे ठराव करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक

शेतकऱ्यांना जर सरसकट कर्जमाफी मिळाली तर शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक दिलासा मिळेल. शेतकरी नव्याने शेती करू लागतील.

ज्याचं कारण म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन पुन्हा शेती करणे खूप त्रासदायक ठरते. शेतीमध्ये पुन्हा पैसा खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी पैसे नसतात.

त्यामुळे शेतकरी आणखीच आर्थिकदृष्ट्या कोलमडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणे प्रचंड गरजचे आहे. 

1 thought on “शेतकऱ्यांना सरसकट मिळणार कर्जमाफी ? लगेच जाणून घ्या”

Leave a Comment