अरे देवा! SBI बँकेच्या नियमांत बदल, ‘या’ खातेदारांना मोठा फटका

बचतीचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य नागरिक ते श्रीमंतापर्यंत विश्वासू ठिकाण म्हणजे बँक. कारण बँकेशिवाय कुठेच तुमची ठेव सुरक्षित ठेवली जात नाही. देशातील सर्वात विश्वासू बँक म्हटलं तर SBI. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत कित्येक नागरिकांची बँक खाती आहेत. आता SBI बँकेने तिच्या नियमांमध्ये काही बदल केला आहे. त्यामुळे बँकेच्या सुविधांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. चला तर मग ही कोणते नियम करण्यात आले आहेत ते जाणून घेऊयात.

sbi bank new rules

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

SBI बँकेच्या नियमांत बदल

SBI बँकेने आता तिच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. बदललेल्या नियमांमुळे बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. 15 जून 2025 पासून SBI बँकेने तिच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. तर SBI बँकेने बचत खात्यावर 50 टक्के आधार अंकांची कपात केली आहे.

त्याचबरोबर वेगवेगळे कालावधी असलेल्या ठेवींसाठी देखील SBI कडून 3 कोटींपेक्षा जास्त Fix Deposit म्हणजेच FD वर देखील 25 आधार अंकांची कपात करण्यात आली आहेत.

खरं तर, झालं असं की, नुकत्याच RBI कडून झालेल्या पतधोरण बैठकीत रेपो रेटबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयानंतर SBI ने नियमांत बदल केला आहे.

शेतकऱ्यांना सरसकट मिळणार कर्जमाफी ? लगेच जाणून घ्या

नव्या नियमांचा फटका कोणाला?

आता SBI च्या या बदलत्या नियमामुळे त्याचा थेट सर्वाधिक परिणाम जेष्ठ नागरिकांच्या खात्यावर होणार आहे. ज्याचं कारण म्हणजे SBI ने बचत खाते आणि FD वरील व्याजदर कमी केले आहे.

SBI बँकेच्या या निर्णयामुळे त्याचा जास्त परिणाम हा ज्येष्ठ नागरिक आणि बचत खाते असलेल्या ग्राहकांवर होणार आहे.

व्याजदरात किती झाला बदल?

SBI बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर आता ग्राहकांना बचत खात्यातील बचतीवर 2.5 टक्के व्याज मिळणार आहे.

या निर्णयापूर्वी 10 कोटींपेक्षा कमी ठेव असलेल्या खात्यांना 2.7 टक्के व्याजदर मिळत होते. तर 10 कोटींहून अधिक व्याजदर असलेल्या खातेदारांना 3 टक्के व्याजदर दिले जात होते. 

Leave a Comment