शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत सहाय्य केले जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पंतप्रधान खरीप पिक विम्याचा अखेरचा हप्ता मिळणे बाकी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष या हप्त्याकडे लागले आहे. आता याच हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. चला तर मग ही अपडेट काय आहे ते जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना पिक विम्याचा मिळणार अखेरचा हप्ता
शेतकरी मित्रांनो पिक विम्याच्या अखेरच्या हप्त्यासाठी 7 हजार 600 कोटी रुपये विमा कंपन्यांना लवकरच देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाकडून देखील आतापर्यंत 6 हजार 584 कोटी रुपये विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पिक विम्याचा अखेरचा हप्ता मिळणे बाकी असून, या हप्त्याचे 1 हजार कोटी रुपये 1 ते 2 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आली आहे.
महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
पिक विम्यासाठी 1 हजार कोटींचा प्रस्ताव
राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पिक विम्याच्या शेवटच्या हप्त्यासाठी 1 हजार कोटींचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असून, लवकरच हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर दोनच दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे पीक पेरणी झाल्यापासून ते पिक काढणीपर्यंत पिक विमा देण्यात येतो. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे. तर वीज कोसळणे, वादळी वारे, मुसळधार पाऊस, गारपीट, पूर परिस्थिती आणि आग अशाप्रकारच्या आपत्तींचा समावेश करण्यात आला आहे.
जूनी पिक विमा योजना सुरू
आता पुन्हा एकदा यंदापासून जुनी पिक विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. राज्यसरकारचे निर्णयानंतर केवळ एक रुपयांत पिक विम्याचा प्रिमियम निघत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. परंतु गैर प्रकारांचा आकडा देखील वाढला. मूळ नुकसान झालेले शेतकरी लाभापासून वंचित राहून इतरांना या योजनेचा लाभ मिळत होता. म्हणूनच आता सरकारने पुन्हा जुनी पिक विमा योजना लागू केली आहे
2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी पिक विम्याच्या हप्त्याबाबत मोठी बातमी! लगेच जाणून घ्या”