घर म्हटलं की, भावकी आलीच. तसे संपत्ती म्हटलं की, त्या संपत्तीचे वाटे हे आलेच. आजकाल संपत्तीच्या वाट्यावरून प्रचंड वाद वाढत आहेत. या वादाचे खटले थेट न्यायालयात पोहोचत आहेत. तसेच हे वाद केवळ मध्यमवर्गीय कुटुंबातच चालत नाही तर मोठ्या श्रीमंत लोकांच्या बाबतीतही घडतात. तसेच कधी कधी कायद्याबाबत अपूर्ण माहिती असल्या कारणाने हे वाद टोकाला जातात. त्यामुळे कायदा काय सांगतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखादी विवाहित मुलगी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करू शकते का? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कायद्यानुसार मुलीला मालमत्तेत हक्क
आता मुलीचा लग्नानंतर वडिलांच्या संपत्ती वरून हक्क सोडला जातो. तिचा वडिलोपार्जित संपत्तीवर काहीच अधिकार किंवा हक्क राहत नाही असा अनेकांचा समज असतो. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
कारण वडिलोपार्जित संपत्तीवर जितका हक्क मुलाचा असतो तेवढाच हक्क मुलीचा देखील असतो. मग ती विवाहित असली तरी तिचा हक्क तिला मिळतो. हिंदू उत्तराधिकार कायदा (2005 सुधारणा) या कायद्यानुसार मुलगा आणि मुलीला संपत्तीमध्ये समान हक्क देण्यात आला आहे. जरी मुलीचे लग्न झाले असले तरी या कायद्यानुसार तिला तिचा संपत्तीचा वाटा मिळतो.
महिलांसाठी धमाकेदार योजना! आता ‘या’ योजनेंतर्गत दरमहा मिळणार 7 हजार, जाणून घ्या
आई- वडिलांच्या कमावलेल्या मालमत्तेवर कोणाचा हक्क?
आई वडिलांनी स्वतः कमावलेल्या मालमत्तेवर पूर्णतः हक्क हा त्यांचाच असतो. आई वडिलांच्या कमावलेल्या मालमत्तेवर कोणत्या मुलांचा अधिकार नसतो.
जर आई वडिलांना वाटले की, त्यांनी स्वतः कमाई केलेली मालमत्ता मुलीच्या नावावर करावी. तर त्यावर मुलगा आक्षेप घेऊ शकत नाही. कारण आई वडिलांनी स्वतः कमावलेल्या मालमत्तेवर कायद्यानुसार मुलाचा हक्क राहत नाही.
भावाची मालमत्ता बहिणीच्या होणार नावावर
तसे पाहायला गेल्यास भावाच्या मालमत्तेवर बहिणीचा कोणत्याही प्रकारचा हक्क नसतो. म्हणजेच जर भावाने कमावलेली मालमत्ता असेल, तर त्यावर बहिणीचा हक्क नसतो.
परंतु काही कारणास्तव भाऊ दगावल्यास आणि त्याच्यामागे कोणीच वारस नसल्यास त्याची मालमत्ता बहिणीच्या नावावर केली जाते.
भावाच्या संपत्तीवर केवळ वर्ग 1- वारसदारांचाच हक्क असतो, परंतु ते नसल्यास वर्ग- 2 वारसदाराच्या नावे मालमत्ता होते. वर्ग-2 वारसांमध्ये बहिण, भाऊ, काका हे नातेवाईक येतात.