महिलांसाठी धमाकेदार योजना! आता ‘या’ योजनेंतर्गत दरमहा मिळणार 7 हजार, जाणून घ्या

देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी सरकार कायमच काही न काही प्रयत्न करत आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. ज्याचा फायदा महिलांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी होईल. कारण सरकारचा असा विश्वास आहे की, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम केले तर त्या जीवनात काहीतरी नक्कीच करू शकतील. त्याचप्रमाणे महिलांसाठी LIC देखील भन्नाट योजना राबवत आहे. आता LIC ने महिलांसाठी एक खास योजना आणली आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

LIC Bima Sakhi Yojana
LIC Bima Sakhi Yojana

महिलांसाठी विमा सखी योजना

LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळने भारतीय महिलांसाठी ‘विमा सखी योजना’ सुरू केली आहे. ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

या योजनेअंतर्गत महिलांना LIC कडून प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर या महिलांना LIC चे विमा एजंट म्हणून काम देण्यात येते. या योजनेंतर्गत महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण देण्यात येते. तसेच त्यांना प्रशिक्षणासोबत स्टायपेंड देण्यात येतो.

महिलांना दर महिन्याला किती रुपये मिळणार?

महिलांना विमा सखी योजनेंतर्गत प्रशिक्षणाच्या काळात दरमहा स्टायपेंड देण्यात येतो. तर महिलांना 3 वर्षांसाठी हे प्रशिक्षण देण्यात येत असून, पहिल्या वर्षासाठी महिलांना दर महिन्याला 7 हजार रुपये देण्यात येतात.

महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

तर सूर्य वर्षी दरमहा 6 हजार रुपये देण्यात येतात. तर तिसऱ्या वर्षी 500 रुपये स्टायपेंड देण्यात येतो. इतकंच नाहीतर, महिला पहिल्या वर्षी पोलिसी विकून तब्बल 48 हजारांपर्यंत कमिशनही मिळवू शकतात.

महिलांना काय मिळणार लाभ?

महिलांचे विमा सखी योजनेचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना  विमा सखी प्रमाणपत्र देण्यात येते. त्याचबरोबर LIC एजंट कोड देखील देण्यात येतो. हा कोड मिळाल्यानंतर महिला अधिकृतपणे विमा एजंट म्हणून काम करू शकतात.

तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांना LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तेथे त्यांना विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.