पीक कर्ज कसे मिळवावे? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

शेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना बी-बियाण, खते, औषधे, मजुरी, सिंचन व्यवस्था अशा विविध बाबींसाठी भांडवलाची आवश्यकता भासते. ही आर्थिक गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेतले जाते, त्यालाच आपण “पीक कर्ज” असे म्हणतो. हे कर्ज फक्त शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे याचा उद्देश इतकाच असतो की शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीपासून दूर जाऊ नये. पीक कर्जाची व्याख्या सामान्य कर्जासारखीच असली तरी ते विशिष्ट शेतीशी संबंधित खर्चासाठी दिले जाते, त्यामुळे याची परतफेडीचा कालावधी देखील ठरावीक हंगामानुसार ठरवलेला असतो.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कोण पात्र आहे पीक कर्जासाठी?

पीक कर्जासाठी कोण पात्र आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी ज्याचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ६५ वर्षांपर्यंत आहे, आणि ज्याच्याजवळ स्वतःची शेती आहे, असा शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करू शकतो.

इतर कोणत्याही व्यवसायासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाप्रमाणेच यामध्ये देखील काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

त्यामध्ये सातबारा उतारा, आठ अ उतारा, सोसायटीचा कर्ज नसल्याचा दाखला, बँकेचे नो ड्यूस सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अधिकृत बँक खाते असणे आवश्यक आहे.

जाणून घ्या‘जिवंत सातबारा’ मोहीम आणि वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

पीक कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत

पीक कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानुसार वेगवेगळी असते. काही राज्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो, तर काही ठिकाणी आजही ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो.

त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या जिल्ह्यात अर्जाची कोणती पद्धत उपलब्ध आहे ते तपासून घ्यावे. जर ऑनलाईन अर्जाची सुविधा नसेल तर जवळच्या बँकेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल.

पीक कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे “व्याजदर”. प्रत्येक बँकेचा व्याजदर वेगवेगळा असतो. काही बँका कमी व्याजदराने कर्ज देतात तर काहींचा दर थोडा अधिक असतो.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करण्याआधी संबंधित बँकेतून त्यांचा नेमका व्याजदर काय आहे, कर्जाची परतफेड कशी करावी लागेल याची संपूर्ण माहिती घ्यावी.

जाणून घ्यामहाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

तसेच, शासनकडून विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, तसेच पीक व्याजात सूट किंवा व्याज परतावा योजना उपलब्ध असतात, त्या देखील वेळोवेळी समजून घेणे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते.

पीक कर्ज हे शेतकऱ्यांसाठी एक आधारस्तंभ ठरतो. मात्र ते योग्य माहिती घेऊन, काळजीपूर्वक, आणि नियम समजून घेतल्यानंतरच घ्यावे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेताना त्याचा उद्देश, कागदपत्रे, अर्ज पद्धती आणि व्याजदर यांचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा.

Leave a Comment