नवीन पिढीचा नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे जास्त कल वाढला आहे. कारण नोकरी म्हटलं की, बांधिलकी आली आणि हवा तेवढा मोबदला मिळणे ही शक्य नाही. त्यामुळे व्यवसाय करून स्वतः मालक बनणे आजकाल तरूणाईला परवडत आहे. परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. म्हणूनच सरकार तरुणाईला व्यवसायासाठी कर्ज देत आहे. त्यासाठी राज्यात जबरदस्त योजना राबविण्यात येत आहे. चला तर व्यवसायासाठी कोणत्या योजनेंतर्गत आणि किती कर्ज मिळत आहे.

राज्यात ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युवक व युवतींना व्यवसायासाठी कर्ज देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यामुळे राज्यातील तरुणाई आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार आहे. राज्यातील वाढणारी बेरोजगारी तसेच तरुणाईच्या मनातील व्यवसाय करण्याची इच्छा पाहता ही योजना आणखी व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरुणांना मिळणार 1 कोटीपर्यंत कर्ज
आता तरुणांना व्यवसायासाठी वाढीव कर्ज मिळणार आहे. तर सुधारित योजनेनुसार सेवा उद्योग व कृषीपूरक व्यवसायांकरता तरूणांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
दुसरीकडे उत्पादन उद्योगांसाठी तरुणांना तब्बल 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. जे कर्ज मिळवण्यासाठी तरुणांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. तसेच सरकारकडून या योजनेसाठी मिळणाऱ्या अनुदानात देखील वाढ करण्यात आली आहे.
शेत रस्त्यांचा ऐतिहासिक निर्णय: शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा १२ फूट रस्ता
काय आहे पात्रता?
आता ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’साठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यापूर्वी या योजनेचा लाभ केवळ 18 ते 45 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकत होते.
तर नवीन सुधारित योजनेनुसार आता 14 वर्षांवरील कोणत्याही स्थानिक युवक- युवतीला योजनेचा लाभ घेता येईल. तसेच शिक्षणाची मर्यादा देखील कमी करण्यात आली आहे. आता 8वी पास तरुणांना 10 लाखांवरील उत्पादन उद्योगासाठी व 5 लाखांवरील सेवा उद्योगासाठी कर्ज मिळणार आहे.
नवीन व्यवसायांचा समावेश
हॉटेल-ढाबा,होम स्टे,क्लाऊड किचन जलक्रीडा व प्रवासी बोट सेवा व्यवसाय, कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग या व्यवसायांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आला आहे.