शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! तत्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनांचा लाभ

सध्याचे युग हे डिजिटल होत चालले आहे. सर्वकाही कमी ही ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे देखील ऑनलाइन स्वरूपात पूर्ण ठेवावी लागतात. त्याचबरोबर सध्या आधार कार्ड ही एक प्रचंड महत्वाची बाब बनली आहे. कारण आज आधार कार्डशिवाय कोणतही काम होऊ शकत नाही. आधार कार्डमुळे व्यक्तीला आपली ओळख पटवणे ते इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळतो. म्हणूनच कोणताही काम करायचं म्हटलं की, सर्वप्रथम आधार कार्ड मागणी करण्यात येते. आता याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक

तुम्हीही शेतकरी आहात आणि तुम्हालाही सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण बँक असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

जर तुम्ही तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक केले नसेल तर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यास फॉर्म भरला तरी देखील त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. ज्याचं कारण की, सरकार केवळ आधार संलग्न बँक खात्यातच सरकारी योजनांचे अनुदान सोडते.

शेतजमिनीवर घर बांधण्यापूर्वी ‘ही’ कायदेशीर माहिती नक्की वाचा, नाहीतर होऊ शकतो मोठा आर्थिक फटका!

आधार आणि बँक खाते लिंक का असावे?

सरकार अनेक योजना डायरेक्ट राबवत आहे. म्हणजेच काही योजना अशा आहेत की, सरकार याचा लाभ थेट शेतकऱ्यांना हस्तांतरित करते.

म्हणजेच महा DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) वर लाभ देते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर या योजनेच्या लाभाचे अनुदान थेट जमा होते.

जर शेतकऱ्यांनी आधार बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांच्या खात्यावर रक्कम येणार नाही. त्यामुळे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहू शकतात.

आधार कार्ड बँक खात्याला कसे लिंक करावे?

तुम्हाला जर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या बँकेत जावे लागेल. सोबतच बँक पासबुक आणि आधार कार्ड न्यावे लागेल.

तसेच बँक अधिकाऱ्यांना तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्याची माहिती द्यावी लागेल. त्यावेळी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि तो देऊन अधिकारी तुमचे काम करून देतील.

तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक झाल्यानंतर तुम्हाला ही माहिती कृषी डेटाबेसमध्ये अपडेट करावी लागेल. त्याचबरोबर तुमचे फार्मर आयडी कार्डमध्येही आधारशी जोडलेल्या बँक खात्याचीच माहिती द्या.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! तत्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनांचा लाभ”

Leave a Comment