तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्याकडे गुंतवण्यात उत्तम रक्कम असेल किंवा आयुष्यभर नोकरी करुन मिळालेले पैसे तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत चांगली योजना घेऊन आलो आहोत. ज्येष्ठ नागरिकांना श्रीमंत करण्यासाठी पोस्ट ऑफिस योजना ही अत्यंत कामी येत आहे. कारण या योजनेवर पोस्ट ऑफिस उत्तम व्याज देखील देत आहे. ती योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. ही योजना वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षित जीवन जगण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर योजनेत सामिल
नोकरीतून निवृत्त झालेले अधिक लोक या योजनेत सामील होतात. कारण या योजनेत गुंतवणूकीवर उत्तम व्याज दिले जाते.व्याज इतके आहे की ज्येष्ठ नागरिक त्यांचा खर्च आरामात भागवू शकता. या योजनेत सहभागी झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही अत्यंत चांगली आणि प्रत्येक वृद्ध व्यक्तीसाठी श्रीमंत होण्याचा मार्ग खुला करणारी योजना आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गुंतवणूक एकदाच करायची असते. पुढील वर्षात कोणताही त्रास नाही. कारण ही एक मुदत ठेव योजना आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकता.
व्याजाची रक्कम मिळवा
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकीच्या दिवसापासून गुंतवणूकदारास व्याजाची रक्कम मिळण्यास सुरुवात होते. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणूकदारांना 8.2 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. जो इतर कोणत्याही बँक किंवा वित्तिय संस्थेपेक्षा नक्कीच जास्त आहे.
5 वर्षानंतर इतके पैसे मिळतील.
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 5 वर्षांसाठी 30 लाख रुपये गुंतवल्यास, 8.2 टक्के दराने 12,30,000 रुपयांपर्यंतचे व्याज गुंतवणुक दारास मिळते. म्हणजेच 5 वर्षानंतर 42,30,000 रुपये एकत्रितपणे मिळतात. 60 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास 65 व्या वर्षी 42,30,000 ही रक्कम तुमच्या हातात असेल जी पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरु शकते.
फक्त ज्येष्ठ नागरिक या योजनेच गुंतवू शकतात पैसे
पोस्ट ऑफिसच्या या जास्त दराने व्याज देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत केवळ 60 वर्षे पूर्ण झालेली व्यक्तीच पैसे गुंतवू शकणार आहे. 5 वर्षासाठी पैसे गुंतवल्यानंतर गुंतवणूकदारास अजून 3 वर्षे वाढवता येतील. जेणेकरुन जास्त रक्कम त्या व्यक्तीच्या हातात मिळेल.