बांधकाम कामगार योजना – महाराष्ट्र राज्य सरकार यंदा योजनांचा पाऊस पाडत आहे आणि त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसत आहे. राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत यामध्ये लाडकी बहिण योजना, लाडका शेतकरी योजना शिवाय वयोवृद्ध लोकांसाठी वयोश्री योजना शिवाय शेतकरी बांधवांसाठी असंख्य योजना राबवल्या आहेत. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला बांधकाम कामगार योजना बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

काय आहे बांधकाम कामगार योजना | Bandhkam Kamgar Yojana
राज्य सरकारने ने बांधकाम कामगार वर्गासाठी ही योजना सुरू केली आहे. आपल्या राज्यात MAHABOCW ही संस्था बांधकाम कामगार वर्गाच्या कल्याणासाठी सदैव झटत असते. शिवाय बांधकाम कामगार वर्गाला आर्थिक साह्य मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्य करते.
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगार वर्गाला 2 हजार रुपये ते 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा राज्यातील 12 लाख बांधकाम मजुरांना झालेला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला MAHABOCW.IN या वेबसाटवर जाऊन नोंदणी करून अर्ज करावा. या योजेअंतर्गत बांधकाम कामगार वर्गाला आर्थिक साह्य सोबत भांड्याचा सेट सुद्धा दिला जातो शिवाय अनेक वेगवेगळे लाभ कामगार वर्ग घेऊ शकतात.
बांधकाम कामगार नोंदणी अश्या प्रकारे करावी
1) सुरुवातीला https://mahabocw.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2)Workers हा पर्याय निवडाः मुख्यपृष्ठावर “Workers” या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर “Worker Registration” निवडा.
3. पात्रता तपासाः नवीन पेज वर तुमची पात्रता संबंधित माहिती भरा आणि “Check Eligibility” वर क्लिक करा.
4. नोंदणी फॉर्म भराः पात्रता निश्चित झाल्यावर, नोंदणी फॉर्म उघडेल. यामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
5. कागदपत्रे अपलोड कराः योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
6. अर्ज सबमिट कराः सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर “Submit” या बटणावर क्लिक करा.
शेतकऱ्यांनो! सौर फवारणी पंपावर 100% अनुदान. लगेच ‘या’ पोर्टलवर करा अर्ज
बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे | Bandhkam Kamgar Yojana Documents
1) योजना लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
2) कामगार वर्गाचे वय हे 18 ते 30 वर्ष एवढे असावे
3) कामगाराने किमान 3 महिने बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे.
4) कामगाराची नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळाकडे असणे आवश्यक.
5) आधार कार्ड, हयात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, वयाचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो.