Post Office PPF Scheme | आजकाल शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण आज शिक्षण आहे तर सगळं आहे, नाहीतर तुम्हाला कोणी साधा जॉब देखील देत नाही. आता कुटुंबात मुलं झाली की प्रश्न येतो तो त्यांच्या शिक्षणाचा. परंतु आजकालच्या महागाईच्या काळात शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी आकारली जाते. फी अभावी अनेकांचे शिक्षण देखील थांबते. पण आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची अशी एक योजना सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलाच्या शिक्षणाची काळजीच जाईल. चला तर मग या योजनेबद्दल जाणून घेऊयात.

Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना
तुम्ही जर इतर गोष्टींप्रमाणे मुलाच्या शिक्षणाचेही आर्थिक नियोजन केले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कारण पोस्ट ऑफिसची ‘पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना’ ही तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. त्यासाठी तुम्हाला या योजनेत 15 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 15 वर्षांनंतर एकवट मोठी रक्कम मिळते. ती रक्कम तुम्ही तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता.
पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेचा कसा घ्यावा लाभ? | Post Office PPF Scheme Benefits
शिक्षणासाठी जबरदस्त ठरणारी पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना कमी बजेट असलेल्या पालकांनाही फायद्याची ठरते. कारण तुम्ही या योजनेत महिन्याला 500 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंत नियमित गुंतवणूक करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेत दर महिन्याला किती रक्कम गुंतवायची आहे हे ठरवावे लागेल आणि योजना सुरू करावी लागेल.
अधिक वाचा: रेशनकार्ड धारकांनो ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी! फॉलो करा सोप्या स्टेप्स अन्यथा नाव होईल रद्द
पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेचा किती मिळेल फायदा?
पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना या योजनेसाठी 7.1 टक्क्यांनी वार्षिक व्याज मिळते. याप्रमाणे तुम्ही जर महिन्याला 2100 रुपये या योजनेत गुंतवले, तर वर्षाला ही रक्कम 25,500 होईल. त्याचप्रमाणे 15 वर्षांनंतर ही रक्कम 3.75 लाख होईल. मॅच्युरिटीवेळी म्हणजेच 15 वर्षांनंतर या रकमेवर वार्षिक 7.1 टक्के व्याजानुसार पूर्ण रक्कम 6,78,035 लाख रुपये मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचे भविष्य या योजनेच्या माध्यमातून उज्ज्वल करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.