रेशन कार्ड हे आपल्या महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. अनेकदा शासकीय कामासाठी पुरावा म्हणून रेशन कार्डची मागणी केली जाते. तसेच यावर स्वस्त अन्न धान्य देखील मिळते. तुम्हीही जर रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता रेशन कार्डधारकांना सरकारकडून तत्काळ ई-केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Ration Card e-kyc)
बनावट रेशन कार्ड धारकांना आळा घालण्यासाठी सरकारने रेशन कार्डची ई केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत. रेशन कार्डच्या केवायसी केल्या तुमचे रेशन सुरू राहते. तसेच ज्यांचे बनावट रेशन कार्ड आहे त्यांचे नाव लिस्टमधून काढून टाकण्यात येते. KYC चा अर्थ Know Your Customer असा होतो. म्हणजेच याद्वारे तुमची ओळख पटवली जाते.

सरकारने वाढवली ई केवायसीची मुदत | Ration Card E-kyc Date
रेशन कार्ड धारकांना लवकरात लवकर आपली केवायसी करून घेणे गरजेचे आहे. सरकारने आता 31 मार्चवरून रेशन कार्डच्या ई केवायसीची तारीख 30 एप्रिल 2025 केली आहे. जर तुम्ही या मुदतीपर्यंत केवायसी केली नाही तर तुमचे नाव रेशन कार्डमधून रद्द करण्यात येणार आहे. आतापर्यंत सरकारने 6 वेळा तारीख वाढवली आहे. तसेच तुम्ही अगदी घरबसल्या देखील तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्डची ई केवायसी करू शकता. मोबाईलवरून ई केवायसी कशी करावी हे पाहुयात. जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमचं रेशन कार्ड अवैध ठरू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला विविध शासकीय योजनांचे लाभ मिळणार नाहीत.
मोबाईलवरून ई केवायसी कशी करावी?
- मोबाईलवरून ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथे तुम्हाला ‘e-kyc for Ration Card’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा नंबर टाकावा लागेल.
- यानंतर तुमच्या कुटुंबप्रमुखाच्या आधार कार्डचा नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईलवर OTP येईल.
- तो OTP टाकून सर्व माहिती भरून सबमिट करावे. अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या रेशन कार्डची ई केवायसी करू शकता.
1 thought on “रेशनकार्ड धारकांनो ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी! फॉलो करा सोप्या स्टेप्स अन्यथा नाव होईल रद्द | Ration Card E-kyc”