आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील सुमारे 90 टक्के लोक शेती आणि शेतीसलग्न व्यवसाय करून आपली जिवजिविका करत असतात. शेतीबरोबरच आर्थिक उत्पादन वाढावे म्हणून शेतकरी वर्ग पशुपालन दुग्ध्यवसाय शेळीपालन असे अनेक जोडधंदे करत आहे.
आपल्या देशात प्रत्येक शेतकऱ्याची घरी जनावरे असतात यामध्ये गाई, म्हैस, शेळ्या यांचा समावेश असतो. दुग्ध व्यवसाय किंवा मांस व्यवसाय करण्यासाठी शेतकरी जनावरे पाळत असतो. परंतु जनावरांना सुद्धा संरक्षण हवे असेल तर शेड म्हणजेच जनावरांना गोठा असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वन्य प्राण्यांपासून पाळीव प्राण्यांच रक्षण होत.

तर मित्रानो सरकारने या योजना राबवन्याच कारण म्हणजे देशात दूध व्यवसायाला चालना मिळावी शिवाय शेतकरी वर्गाला उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण होऊन शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी वेगवेगळ्या योजना आमलात आणल्या जात आहेत. त्यामुळे सरकार ने पाळीव प्राण्यांसाठी मनरेगा ॲनिमल शेड योजना आखली आहे.
मनरेगा पशु निवारा योजना | MGNREGA Pashu Shed Yojana
मनरेगा पशु सेवा योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यांतर्गत चालवली जाणारी योजना आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला पशुलापालणाच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना आखली आहे या योजनेमुळे पशूंना निवारा आणि संरक्षण मिळणार आहे.
कसे मिळेल अनुदान
जर एका शेतकऱ्याकडे तीन जनावरे असतील तर त्याला शेड बांधणीसाठी 75,000 ते 80,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. चार गुरे असलेल्या कोणत्याही प्रजननाला 100,000 रुपये अनुदान दिले जाईल. 6 पेक्षा जास्त जनावरे असलेल्या कोणत्याही पशुपालन शेतकऱ्याला 160,000 रुपये अनुदान दिले जाईल.
मनरेगा पशु निवारा योजना पात्रता
1) अर्जदाराकडे किमान 2 जनावरे असावी. 6 जनावरांसाठी किमान 1.60 लक्ष अनुदान देण्यात येईल.
2) अर्जदाराने अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जिल्ह्यातील मनरेगा विभागाकडे द्यावीत.
3)योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा पंजाबमधील रहिवाशी असावा.
मनरेगा पशु निवारा योजना आवश्यक कागदपत्रे
1)आधार कार्ड
2)पत्ता पुरावा
3)मनरेगा जॉब कार्ड
4)पासपोर्ट साइज फोटो
5)बँक खाते तपशील
6)मोबाईल नंबर