वृद्ध नागरिकांना महिन्याला मिळणार 1 हजार 500 रुपये, लगेच जाणन घ्या सरकारची काय आहे योजना? | Shravan Bal Yojana

Shravan Bal Yojana – देशातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात खूप फायदा होतो. त्यामुळे नागरिकांना सरकारच्या प्रत्येक योजनांची माहिती मिळणे देखील आवश्यक असते. ज्याचं कारण म्हणजे या योजनांच्या मार्फत नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक अशी योजना राबवली जात आहे की, ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. चला तर मग ही योजना कोणती आहे ते जाणून घेऊयात.

Shravan Bal Yojana
Shravan Bal Yojana

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी योजना म्हणजे ‘श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना’ होय. सरकारच्या या योजने चा वृद्ध आणि निराधार नागरिकांना मोठा फायदा होतो. राज्यातील वृद्ध आणि नागरिकांना सरकारच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

महिन्याला मिळणार 1500 रुपये

निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या वृद्धपकाळामध्ये त्यांचा आधार होण्याचे काम या योजनेअंतर्गत केले जाते. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत या वृद्ध नागरिकांना 1 हजार 500 रुपये देण्यात येतात. या आर्थिक मदतीतून ज्येष्ठ नागरिक आपल्या मूलभूत गरजा भागवू शकतात. श्रावण बाळ या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज करू शकता. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात दर महिन्याला या योजनेची रक्कम जमा होते. त्यामुळे वृद्ध निराधार व्यक्तींना सरकारचा एक मदतीचा हात या नागरिकांना मिळतो.

काय आहे पात्रता? | Shravan Bal Yojana Eligibility

  • श्रावण बाळ राज्यसेवा निवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे 65 वय पूर्ण असावेत. 
  • अर्ज करणारा व्यक्ती हा पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • तसेच अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजारांहून कमी असणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे | Shravan Bal Yojana Documents

  • आधार कार्ड 
  • मतदान कार्ड 
  • बँक पासबुक 
  • रेशन कार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

Leave a Comment