राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी नागरिक व शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले जातात. शेतकऱ्यांसाठी सतत गरज पडल्यास मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. आता अशाच प्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या 903 योजनांबाबत निर्णय घेतला आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय
राज्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. परंतु अनेक योजना अशा देखील होत्या ज्या प्रत्यक्षात बंदच होत्या. त्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता.
भूसंपादनाबाबत येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर स्थानिक नागरिकांचा होणारा विरोध व ठेकेदारांकडून देखील मिळणारे असहकार्य यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळाला नाही.
म्हणूनच सरकारने या योजनांना आणखी अधिकचा वेळ देण्यापेक्षा या योजना प्रशासकीय मान्यतेनुसार थेट रद्द करण्याचाच विचार केला आणि थेट निर्णय घेतला.
महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
राज्यातील 903 योजना रद्द
सरकारच्या या योजना चालू असून देखील या योजनांच्या निधीचा गैरवापर केला जात होता. आता राज्य सरकारने राज्यातील अशा 903 योजना प्रशासकीय मान्यतेनुसार रद्द केल्या आहेत.
त्यामुळे या योजनेसाठी निघणारा निधी देखील बंद होईल आणि या निधीचा होणारा गैरवापर देखील थांबेल. या निर्णयामुळे राज्य सरकारला आता शेतकरी बांधवांसाठी नव्या योजना सुरू करण्यासाठी मार्ग देखील मोकळा होणार आहे.
नवीन योजना होणार सुरू
राज्य सरकारने मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात यामध्ये लघुपाटबंधारे योजना, पाझर तलाव, कोअर पाझर बंधारे, साठवण तलाव दुरुस्ती योजना याप्रकारच्या अनेक योजनांचा समाविष्ट आहेत.
कारण या योजना सुरू असून देखील त्यांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षांपासून बंदच होती. या योजना बंद केल्यानंतर सरकार राज्यात नवीन कार्यक्षम योजनांची घोषणा करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
1 thought on “राज्य सरकारचा मोठा निर्णय! 903 योजना प्रशासकीय मान्यतेनुसार रद्द, नव्या कार्यक्षम योजना होणार सुरू”