केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. विशेष बाब म्हणजे हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या भरू शकता. त्यासाठी कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरला जाण्याची गरज नाही. या लेखात आपण पाहणार आहोत की घरकुल योजनेसाठी ऑनलाईन सर्व्हे आणि फॉर्म कसा भरायचा.

सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये दोन अत्यंत महत्त्वाची अॅप्स डाऊनलोड करावी लागतील –
पहिलं अॅप म्हणजे Awaas Plus 2024. हे Google Play Store वरून “Awaas Plus 2024” असं सर्च करून इन्स्टॉल करा.
दुसरं अॅप म्हणजे Aadhaar Face RD. हे सुद्धा प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप आधार फेस ऑथेंटिफिकेशनसाठी वापरलं जातं.
इंस्टॉलेशननंतर Awaas Plus अॅप ओपन करा. सुरुवातीला भाषा निवडावी लागते. मराठी पर्याय नसेल, तर इंग्रजी निवडा. लागणाऱ्या सर्व परमिशन्स “Allow” करा.
त्यानंतर ‘Self Survey’ या पर्यायावर क्लिक करा. आता घरातील प्रमुख व्यक्तीचा आधार नंबर टाका व Authenticate वर क्लिक करा. यानंतर चेहरा स्कॅन करण्यासाठी कॅमेरा उघडेल. गोल बॉक्समध्ये चेहरा सेट करून डोळे ब्लिंक करा.
ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यावर KYC पूर्ण होईल आणि व्यक्तीचे नाव व फोटो स्क्रीनवर दिसतील. यानंतर ४ अंकी पिन तयार करा आणि पुढे जा. लोकेशन सिलेक्ट करताना तुमचं राज्य (महाराष्ट्र), जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि गाव निवडा. लोकेशननंतर ‘Add/Edit Survey’ या पर्यायावर क्लिक करा. आता संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती टाकायची आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! 903 योजना प्रशासकीय मान्यतेनुसार रद्द, नव्या कार्यक्षम योजना होणार सुरू
सर्वे फॉर्ममध्ये संबंधित व्यक्तीचं पूर्ण नाव, आधार नंबर, जॉब कार्ड क्रमांक, लिंग, जातीचा प्रकार (SC/ST/Other), वय, वैवाहिक स्थिती, वडील/पतीचे नाव, मोबाईल नंबर, शिक्षणाची माहिती, व्यवसाय/नोकरी यासंदर्भात माहिती भरावी लागते.
त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची संख्या रेशन कार्डनुसार भरावी लागते. अपंगत्व, गंभीर आजार, कुटुंबाचे उत्पन्न, यासंदर्भातील माहितीही विचारली जाते. “Add Family Member” वर क्लिक करून प्रत्येक सदस्याचं नाव, आधार नंबर, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आणि नातं यांची माहिती भरावी लागते. प्रत्येक सदस्यासाठी फेस KYC सुद्धा करावी लागते. बँक डिटेल्समध्ये बँकेचा प्रकार, बँकेचं नाव, IFSC कोड, खाते क्रमांक (दोनदा), आणि पासबुकवरील नाव भरायचं असतं. जर पासबुक नसेल, तर “I don’t have” वर क्लिक करून पुढे जाता येते.
त्यानंतर घराच्या स्थितीबाबत विचारले जाते – घर भाड्याचं आहे का स्वतःचं, भिंती व छप्पर पक्कं आहे की कच्चं, किती खोल्या आहेत, शौचालय आहे का, उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे, तीन/चार चाकी वाहन आहे का, शेतीसाठी साधनं आहेत का, शासकीय नोकरी आहे का, अशा प्रश्नांची उत्तेर भरा. तसेच घरासाठी जागा आहे का, आणि योजना पूर्वी लाभ घेतले आहेत का यासंदर्भातील प्रश्नही विचारले जातात.
त्यानंतर जुन्या घराचे दोन फोटो (एक जवळून, एक लांबून) काढून अपलोड करावे लागतात. काहींना प्लॉटचा फोटो टाकण्याचाही पर्याय येतो. शेवटी “Beneficiary Preference” मध्ये ट्रेनिंग हवं का हे विचारलं जातं. ही माहिती भरल्यानंतर सर्व फॉर्म सेव्ह करून सबमिट करा
घरकुल योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना जर हे सर्व टप्पे पद्धतशीर पार पाडले, तर तुमचा अर्ज सहजतेने सबमिट होतो. सर्व माहिती योग्य व सत्य भरा, आणि आवश्यक फोटो व्यवस्थित अपलोड करा.
1 thought on “घरकुल योजनेचा फॉर्म भरा आता घरबसल्या! – संपूर्ण मार्गदर्शन”