शेतकऱ्यांना कुठलाही हंगाम यायचं म्हटलं की, पेरणी किंवा पिकाची लागवड करणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना अगोदरच तयारी करून ठेवावी लागते. कारण ऐन हंगामाच्या तोंडावर तयारी करायला गेल्यास शेतकऱ्यांची धावपळ होते आणि पीकही उशिरा येते. शेतकऱ्यांना पिक लागवडीसाठी शेतात खूप पैसे खर्च करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांच्या हाताला पिक येते. तर दुसरीकडे सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांना सध्या 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप केले जात आहे. याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे.

बियाणे अनुदानाला मुदतवाढ
आता राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची लगबग सुरू करावी लागणार आहे. अशाच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्फत 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. ज्याची अंतिम तारीख 31 मे 2025 होती. परंतु सदर योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी आता या योजनेचा आणखी लाभ घेऊ शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे
राज्यात कृषी विभागाच्या माध्यमातून 100 टक्के अनुदान बियाणे वाटप योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शेतकरी महाडीबिटी पोर्टलवर घेऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी या पोर्टलवर 100 टक्के अनुदान बियाणे योजनेसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मूग, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, भात या पिकांच्या बियाण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या बियाण्याचे वाटप लवकरात लवकरच केले जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य
तसेच जे शेतकरी 100 टक्के अनुदान बियाणे योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची बियाणे सोडतमध्ये निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. जे शेतकरी यामध्ये निवडले जातील केवळ त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ म्हणजेच 100 टक्के अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहेत.
2 thoughts on “शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळणार बियाणे; पाहा कोणत्या बियाण्यांच्या समावेश अन् कुठे करावा अर्ज?”