मोबाईलवरून पाहा तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे! | Shet Jamin Information

आज आपण डिजिटल युगात आहोत. बँकेचे व्यवहार असोत, बिल भरणे असो किंवा आधारकार्ड संबंधीत गोष्टी अपडेट करणं असो सगळं काही मोबाईलवर आणि ऑनलाइन करता येते.  याच डिजिटल क्रांतीचा फायदा आता आपले शेतकरी बंधू देखील मिळवू शकणार आहेत. जमीनधारक मालकांना आणि शेतकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतजमिनीची माहिती घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागत असे, पण आता ती गरज नाही. मोबाईलवरून घरबसल्या आपल्याच नावावर किती शेती आहे हे सहजपणे पाहता येतं.

आपल्याला शेतीची माहिती का पाहावी लागते?

बरेचदा आपल्या नावावर किती एकर शेती आहे, हे आपल्यालाच माहीत नसतं. काही वेळा शेती वारसाहक्काने वाटली जाते, काही वेळा घरातल्या सदस्यांच्या नावे असते. मग असा प्रश्न उभा राहतो की माझ्या नावावर नेमकी किती जमीन आहे?, वडिलांच्या नावावर किती आहे? काकांच्या किंवा आपल्या भावाच्या नावावर किती जमीन आहे? अशा वेळी ही माहिती मिळणं खूप महत्त्वाचं असतं – तेही योग्य आणि अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनच. Shet jamin information

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

शेतजमिनीची माहिती पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे:
 https://bhulekh.mahabhumi.gov.in ही महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट आहे जिथे तुम्ही सातबारा उतारा, ८अ उतारा आणि इतर जमिनीसंबंधित दस्तऐवज पाहू शकता. Shet jamin information

मोबाईलवरून शेतजमिनीची माहिती कशी पहायची

सुरुवातीला या वेबसाईटवर जा. त्यानंतर ‘सातबारा उतारा’ हा पर्याय निवडा. आता तुमचं जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढील पानावर विविध पर्याय दिसतील – जसं की गट क्रमांक, खातेदार नाव, ८ अ उतारा इत्यादी. तुम्हाला जर तुमच्या नावावर शेतजमीन पाहायची असेल, तर ‘खातेदार नावाने शोधा’ हा पर्याय निवडायचा. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव तिथं टाका. नंतर त्या नावाची यादी समोर येईल. तुमचं नाव शोधा आणि त्यावर क्लिक करा. लगेच त्या नावावर असलेली सगळी शेतीची माहिती तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येईल. या सुविधेमुळे फक्त तुमच्याच नव्हे, तर तुमच्या आई-वडिलांचं, भावाचं, पत्नीचं किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचं नाव टाकून त्यांच्या नावावर किती शेती आहे, हे देखील बघू शकता. त्यामुळे शेती वाटणी, व्यवहार किंवा कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी ही माहिती फार उपयुक्त ठरते. Shet jamin information

1 thought on “मोबाईलवरून पाहा तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे! | Shet Jamin Information”

Leave a Comment