National Agriculture Market शेती क्षेत्रात पारंपरिक बाजारपेठांसंदर्भातील समस्या, दलालांचा हस्तक्षेप आणि शेतीमालाच्या भावातील चढ उतार या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरल्या आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) – e-NAM ची स्थापना केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल आह. या डिजिटल व्यापार पोर्टल च्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यासाठी पारदर्शक, स्पर्धात्मक आणि सोयीस्कर बाजारपेठ निर्माण करण्याचा हा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण प्रयत्न आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून याबद्दल अधिक माहिती मिळवूया.

e-NAM म्हणजे काय? What is e-NAM
e-NAM (Electronic National Agriculture Market) ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच्या माध्यमातून देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMC) एकमेकांशी डिजिटल पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत. यामुळे शेतकरी आपल्या शेतीमालाची विक्री कोणत्याही राज्यातील बाजारात करू शकतो.
अधिक वाचा – शेतकऱ्यांना 10 टक्के मिळणार वाढीव पीक कर्ज. जाणून घ्या
e-NAM पोर्टल मार्फत कसे काम होते?
- e-NAM अंतर्गत देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे डिजिटलायझेशन केले जात आहे.
- सर्वप्रथम देशभरातील शेतकरी e-NAM पोर्टलवर आपला शेतीमाल नोंदवतात.
- व्यापारी ऑनलाइन माल पाहून बोली लावतात.
- सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आणि पारदर्शकतेने पूर्ण होते.
- येथे कोणीही मध्यस्थी नसल्याने शेतकऱ्याला थेट त्याच्या खात्यात पैसे मिळतात.
e-NAM पोर्टलचे शेतकऱ्यांना फायदे (Benefits of e-NAM for Farmers)
1. एकात्मिक राष्ट्रीय बाजारपेठ
e-NAM हे प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या राज्यांतील APMC मंडईंना जोडते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ स्थानिक बाजारात नव्हे तर देशभरातील बाजारात सहभाग घेता येतो.
2. पारदर्शकता आणि विश्वासार्हता
या डिजिटल यंत्रणेमुळे बाजारभाव, मालाची गुणवत्ता, खरेदी सर्व काही पारदर्शकपणे करता येते. त्यामुळे भ्रष्टाचार आणि दलालगिरीला आळा बसतो.
3. शेतकऱ्यांना मिळणार योग्य दर
देशभरातील व्यापारी एकाच मालासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळतो.
4. दलालांचा हस्तक्षेप नाही
e-NAM शेतकरी आणि व्यापाऱ्यांना थेट जोडतो. त्यामुळे दलाल किंवा मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते.
5. मोबाईल अॅपद्वारे व्यवहार
e-NAM हे मोबाइल अॅप शेतकरी कुठूनही वापरून अपडेटेड बाजारभाव पाहू शकतात आणि त्यानुसार व्यवहार करू शकतात.
शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) ही योजना एक डिजिटल क्रांती असून यामुळे शेतमाल विक्रीसाठी अधिक पर्याय, स्पर्धात्मक दर, आणि पारदर्शक प्रक्रिया सहज उपलब्ध झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे. भविष्याच्या दृष्टीने ही योजना शाश्वत शेती विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल ठरताना दिसून येत आहे .