Ladaki Bahin Yojana Update – मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण” ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांना दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. मात्र, मे महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संभ्रमाची स्थिती असून अनेक लाभार्थी महिलांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी सोशल मीडियावरही अशा अफवा पसरवल्या जात आहेत की ही योजना बंद होणार आहे.

परंतु या साऱ्या चर्चा आणि गैरसमजांना पूर्णविराम देत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “माझी लाडकी बहिण” योजना पूर्ण ताकदीने सुरु आहे आणि योजनेचा लाभ महिलांना मिळत राहणार आहे.
मे महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशीराने वितरित होत आहे, परंतु तो लवकरच सर्व पात्र लाभार्थींना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता
योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता यावी यासाठी चार महिन्यांपूर्वी एक तपासणी मोहीम राबवण्यात आली होती.
या तपासणीत हे निदर्शनास आले की, काही शासकीय महिला कर्मचारी – ज्या मूळ नियमांनुसार पात्र नव्हत्या – त्या या योजनेचा लाभ घेत आहेत. या अनियमिततेमुळे शासनाने तत्काळ अशा लाभार्थींना थांबवले आणि त्यांच्या लाभावर तात्पुरती स्थगिती आणली.
या प्रक्रियेमुळे काही प्रमाणात इतर पात्र महिलांचाही हप्ता रखडला. मात्र, सध्या या सगळ्या बाबींची योग्य शहानिशा पूर्ण करण्यात आली आहे.
महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हेही स्पष्ट केले की, या योजनेमागे सरकारची सामाजिक बांधिलकी आहे.
शेतकऱ्यांना 10 टक्के मिळणार वाढीव पीक कर्ज. जाणून घ्या
महिलांना दरमहा आर्थिक मदत केल्यामुळे त्या आपल्या वैयक्तिक गरजा भागवू शकतात, बचत करू शकतात आणि छोट्या उद्योगांची सुरुवातही करू शकतात. म्हणूनच ही योजना महिला सबलीकरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरली आहे.
राज्यभरातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि भविष्यातही हा लाभ सुरूच राहणार आहे. योजना बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शासनाच्या वतीने लवकरच मे महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.
“माझी लाडकी बहिण” ही योजना बंद होत नसून ती सुरूच राहणार आहे. काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे मे महिन्याचा हप्ता रखडला असला, तरी तो लवकरच मिळणार आहे. शासन महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध आहे.
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता रखडल्याने संभ्रम, पण लाभ कायमच राहणार – सरकारची स्पष्ट भूमिका”