मुलींसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या योजना देणार उज्वल भविष्य

मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरण यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश मुलींच्या शिक्षणावरचा खर्च कमी करणे, त्यांच्या लग्नासाठी निधीची तरतूद करणे आणि मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे असा आहे. चला तर मग या योजनांची माहिती मिळवूया.

Sarkari Yojana For Girls

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची अल्पबचत योजना असून मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडले जाते. यात 8% वार्षिक व्याज मिळते आणि गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळते. दीड लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. 21 वर्षांनंतर भरघोस रक्कम मिळते. या योजनेवर सरकारकडून सध्या 8% वार्षिक व्याज दिलं जातं.  या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल दीड लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

बालिका समृद्धी योजना

बालिका समृद्धी योजना गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे. जन्मानंतर 500रु अनुदान मिळते आणि शालेय शिक्षणासाठी दरवर्षी 300रु ते 1,000रु पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. अठराव्या वर्षी ही रक्कम मुलीच्या खात्यातून काढता येते.. या योजनेत मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात येते आणि सुरुवातीला सरकारकडून 500 रु अनुदान दिलं जातं. यानंतर मुलगी शाळेत जात असताना दरवर्षी शिष्यवृत्ती रूपात पैसे तिच्या खात्यात जमा केले जातात.

महिलांसाठी धमाकेदार योजना! आता ‘या’ योजनेंतर्गत दरमहा मिळणार 7 हजार, जाणून घ्या

सीबीएसई उडान योजना

सीबीएसई उडान योजना ही CBSE बोर्डातील विज्ञान व अभियांत्रिकीसाठी तयारी करणाऱ्या मुलींना मोफत ऑनलाईन शिक्षण, ई-लर्निंग साहित्य व डिजिटल साधनांचा लाभ देते. शिक्षणात संधी समानता मिळवून देण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.या योजनेअंतर्गत मुलींना ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून मोफत मार्गदर्शन दिलं जातं. त्यांना अभ्यास साहित्य, ई-लर्निंग टूल्स, तसेच टॅबलेट्ससारख्या डिजिटल साधनांचं वाटपही केलं जातं. शिक्षणाच्या संधी समान करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून एका किंवा दोन मुली असलेल्या कुटुंबांना योजनेअंतर्गत मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने संयुक्त बँक खाते उघडले जाते. या खात्यात शासनाकडून दोन टप्प्यांत अनुदान दिलं जातं. जर एखाद्या कुटुंबाने पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल, तर त्यांना ₹50,000 ची थेट रक्कम दिली जाते. ही रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाते आणि त्यावरील व्याज मुलीच्या सहाव्या, बाराव्या आणि अठराव्या वर्षी दिलं जातं.

1 thought on “मुलींसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या योजना देणार उज्वल भविष्य”

Leave a Comment