सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. सतत नवनवीन योजना आणून महिलांचे जीवनमान उंचावण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देखील देत. अर्थातच नव्या योजना काढून सरकार दुर्बल घटकांतील महिलांना आर्थिक मदत करत आहे. राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गाजत आहे. या योजनेंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. अशातच आता सरकारने आणखी एक योजना सुरू केली आहे. चला तर मग याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मोफत पिठाची गिरणी योजना
राज्य सरकारच्या माध्यमातून दूर्बल घटकातील महिलांच्या हाताला काही काम लागावे तसेच त्यांच्या हातात पैसे यावेत यासाठी राज्यात ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येते. यामुळे महिला घरबसल्या पिठाची गिरणीचा व्यवसाय करू शकतात. महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांपैकी ही एक योजना आहे. महिलांना या योजनेंतर्गत 90 टक्के अनुदान देण्यात येते आणि 10 टक्के रक्कम आपल्याला भरावी लागते. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल.
आवश्यक पात्रता काय?
महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी खालील अटी शर्ती पूर्ण केल्या पाहिजे. तरच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
• अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे असणे आवश्यक आहे.
• अर्जदार महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असणे अनिवार्य आहे.
• अर्जदार महिलेचे उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा कमी असावे.
• तसेच महिलेचे बँक खाते असावे.
मुलींसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या योजना देणार उज्वल भविष्य
महत्वाची कागदपत्रे काय?
मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही महत्वाची कागपत्रे द्यावी लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, रेशन कार्ड तसेच बँक खात्याचे तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि BPL कार्ड असल्यास सरकारमान्य विक्रेत्याचे कोटेशन असणे गरजेचे आहे.