घरकुल योजना 2025: तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? लगेच तपासा!

प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हक्काचं घर असावं याच स्वप्न पाहत असतो. स्वतःची हक्काच्या घरासाठी कष्ट करून एक एक पैसा गोळा असतो. पण आता तुमच्यासाठी घर बनवण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागांतील गरजू अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘घरकुल आवास योजना’ राबवत आहे. ही योजना गेल्या काही वर्षांपासून चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. आता शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Gharkul Yojana List

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजना

राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुलाचा थेट लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत

लाभार्थ्यांना सुलभ दरामध्ये टप्प्याटप्प्याने अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत घरासाठी अनुदान देण्यात येत आहे.

त्याचबरोबर ज्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज केले होते त्यांची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये तुमचं नाव आहे की, नाही हे कसे तपासावे ते स्टेप बाय स्टेप पाहुयात.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवर नोंदणी करून मिळवा ‘या’ योजनांचा लाभ

घरकुल योजनेत तुमचे नाव कसे तपासावे?

तुम्हाला जर तुमचे नाव घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासायचे असेल तर तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
• सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर pmayg.nic.in या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल.
• तिथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण वेबसाइट ओपन केल्यानंतर “AwaasSoft” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला ‘रिपोर्ट’ नावाच्या सेक्शनमध्ये जावे लागेल.
• त्यानंतर तुम्हाला Social Audit Report निवडावे लागेल. • तुम्हाला त्या पेजवर “Social Audit Reports” या पर्यायावर क्लिक करावे.
• यानंतर “Beneficiary Details For Verification” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर नवीन MIS Report विंडो ओपन होईल. त्यावर तुमची माहिती भरा.
• विचारलेली सर्व माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करा. यानंतर तुमच्यासमोर यादी ओपन होईल या यादीत तुमचे नाव शोधा. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी घर, घर मजुरीचा क्रमांक आणि सध्याची बांधकाम स्थिती समजेल 

1 thought on “घरकुल योजना 2025: तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? लगेच तपासा!”

Leave a Comment