केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. शेतकऱ्यांसाठी राज्यात अनेक योजना राबवल्या जात असून, या योजना कोणत्या आहेत हे देखील शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. तसेच या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवर राबवण्यात येतात. आज आपण राज्यात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवण्यात येतात याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत पिकासंबंधितच्या सुविधा, सिंचन साधने व यंत्र अवजारे देण्यात येतात. तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य, गळीतधान्य, भात, कापूस, ऊस या पिकांसाठी हा लाभ देण्यात येतो. तर शेतकऱ्यांना इलेक्ट्रीक मोटार, बियाणे, मळणी यंत्र, पीव्हीसी पाईप्स, डिझेल इंजिन, पेरणी यंत्र, बीबीएफ पेरणी यंत्र, पीक संरक्षण औषधे, सूक्ष्म मूलद्रव्ये यासाठी लाभ देण्यात येतो.
- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण
- कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
- राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना
या तीनही योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध यंत्रे व अवजारांसाठी अनुदान देण्यात येते. ज्यामध्ये रोटाव्हेटर, ट्रॅक्टर, BBF पेरणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र प्लँटर, मळणी यंत्र, पॉवर टिलर, रिजर, पॉवर विडर, स्प्रेअर्स, रिपर आणि इतर यंत्रे यांचा समावेश आहे.
महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना यंत्रे देण्यात येतात. तर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, हरितगृह, शेडनेट, पॉवर टिलर, कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, क्षेत्रविस्तार घटक, प्लॅस्टिक मल्चिंग, पीक संरक्षण उपकरणे, काढणी पश्चात व्यवस्थापनासाठी (रेफर व्हॅन, पॅक हाऊस, शीतगृह आणि फिरते विक्री केंद्र ) आळंबी उत्पादन व नर्सरी तसेच जुन्या फळबागांचे पुर्नजीवनासाठी देखील अनुदान देण्यात येते.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- SC/ST शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
वरील सर्व योजना सिंचनासाठी राज्यात राबवण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पंपसंच, वीज जोडणी आकार, शेततळाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, नवीन विहीर बांधकाम, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, सूक्ष्मसिंचन संच (ठिबक व तुषार), सोलर पंप यासाठी अनुदान देण्यात येते.
- शेतकरी गट / शेतकरी कंपनी / शेतकरी संघासाठी कृषी विभागाच्या योजना
- कृषी यांत्रिकीकरण उपअभियान
या दोन्ही योजनेंतर्गत देखील शेतकऱ्यांना विविध यंत्रे आणि औजारे यासाठी लाभ देण्यात येतो. जसे की, रोटाव्हेटर, नांगर, पेरणी यंत्र, BBF पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मळणी यंत्र, पॉवर विडर, स्प्रेअर्स , रिजर, रिपर आणि त्यासह इतर यंत्रांसाठी देखील लाभ देण्यात येतो.
2 thoughts on “शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवर नोंदणी करून मिळवा ‘या’ योजनांचा लाभ”