निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा किंवा जास्त आर्द्रतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा वेळी फळपीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरतो. मात्र 2025 साली या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

या वर्षी विमा अर्ज प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी जिओ टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. पूर्वी जरी जिओ टॅगिंगची अट होती, तरी अंमलबजावणीत शिथीलता होती.
आता मात्र फळबागेचे छायाचित्र आणि जिओ टॅगिंग अनिवार्य केले असून, याची पडताळणी काटेकोरपणे केली जाणार आहे. यासोबतच ई-पीक पाहणी प्रणालीत नोंदवलेले फळबाग क्षेत्र, मूळ आकृती व प्रत्यक्ष क्षेत्र एकसारखे नसल्यास, विमा अर्ज सरसकट रद्द केला जाईल.
फळबाग विमा योजनेत अर्ज करताना फार्मर आयडी म्हणजेच AgriStack नोंदणी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जमीन उताऱ्याची सॉफ्ट कॉपी अनिवार्य आहे. अर्ज करताना दिलेली माहिती अचूक असून तांत्रिक चुका टाळण्यासाठी सर्व दस्तऐवजांची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.
पूर्वी घोषित केलेल्या अंतिम तारखांनुसार मोसंबी आणि चिकू यासाठी 30 जून, डाळिंबसाठी 14 जुलै, तर सीताफळसाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. मात्र लिंबू, द्राक्ष, पेरू आणि संत्रा यांसाठी 14 जून रोजीच मुदत संपली आहे.
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवर नोंदणी करून मिळवा ‘या’ योजनांचा लाभ
यंदा शेतकऱ्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याचे लक्षात घेता, कृषी विभागाने केंद्र सरकारकडे अर्ज मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. तीन विमा कंपन्यांनी याला मंजुरी दिली असून, चौथी कंपनीही तयार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे 30 जूनपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलवलेल्या फळबागा काही मिनिटांच्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त होतात. अशावेळी फळपीक विमा योजना ही एकमेव आश्वासक मदतीचा पर्याय आहे.
नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याला नव्याने उभारी घेता येते, आर्थिक नुकसान भरून निघते आणि उत्पादन चक्र टिकवता येते. त्यामुळे वेळेत आणि योग्य कागदपत्रांसह अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा करा अर्ज
फळपीक विमा अर्ज राष्ट्रीय कृषी विमा पोर्टलवर म्हणजेच www.ncip.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने भरु शकता. अर्ज भरताना मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी पूर्वतयारीत ठेवावी.
फळपीक विमा योजना 2025 मध्ये बदल झाले असले तरी ती अजूनही शेतकऱ्यांसाठी एक आधारवड आहे. पण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर कडक नियमांचे पालन करणे आणि वेळेवर योग्य माहिती व कागदपत्रांसह अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनेची माहिती समजून घेऊन योग्य पावले उचलणे गरजेचे आहे.
1 thought on “फळपीक विमा 2025: अर्ज करण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा!”