ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! एफआरपीमध्ये इतक्या रुपयांची वाढ, जाणून घ्या किती मिळणार एफआरपी? | Sugarcane FRP

Sugarcane FRP – आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती करतात. कारण ऊस हे एकमेव असे पीक आहे ज्याला अधिक देखभालीची गरज भासत नाही. तसेच  ऊसाला दरही चांगला मिळतो. अशातच आता केंद्र सरकारने ऊस शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण केंद्र सरकारने आता ऊसाच्या क्विंटलमागे एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) वाढ केली आहे. ज्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. चला तर मग ऊसाच्या एफआरपीमध्ये किती रुपयांची वाढ केली आहे ते जाणून घेऊयात.

Sugarcane FRP
Sugarcane FRP

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ

तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी केंद्रिय मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यावेळी वेगवेगळे शासन निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सरकारने शेतकऱ्यांचा विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्याचवेळी ऊसाच्या एफआरपीमध्ये क्लिंटलमागे 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही गोड बातमी ठरणार आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ

आता 2025- 2026 या वर्षासाठी शेतकऱ्यांना 10.25 टक्के साखर उताऱ्यासाठी क्विंटलला 355 रुपये एफआरपी दर मिळणार आहे. तसेच जर 9.5 टक्क्यापेक्षा  कमी उतारा असल्यास तरी देखील अधिक कपात न करता 329 यांचा एफआरपी दर देण्यात येहर आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 

यापूर्वीचे ऊसाचे एफआरपीचे दर

तर शेतकऱ्यांना 2024- 2025 च्या गाळप हंगामात 10.25 टक्क्यांनी ऊसाला प्रतिक्विंटल 340 रुपये एफआरपी मिळत होता. ज्यामध्ये आता 15 रुपयांची वाढ होऊन तो 355 रुपये मिळणारं आहे. दुसरीकडे साखरेचा उतारा जास्त असल्यास प्रत्येकी 0.1 टक्क्यामागे 3.46 रुपये जास्त एफआरपी मिळणार आहे. त्याचबरोबर जर 10.15 टक्क्यांपेक्षा साखरेचा उतारा कमी असल्यास प्रत्येकी 0.1 टक्क्यामागे 3.46 रुपये कमी एफआरपी देण्यात येणार आहे. 

Leave a Comment