देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते.सदर हप्ते दर चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात. 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात आला होता, त्यामुळे आता 20 वा हप्ता जून 2024 मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे – PM Kisan Yojana 20th installment update

पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 20 जून 2024 च्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सध्या सुमारे 10 कोटी शेतकरी लाभार्थी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जेणेकरून पीएम किसान योजनेचा लाभ वेळेवर मिळावा, त्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ई-केवायसी (eKYC) पूर्ण केलेली असावी, आधार सीडिंग (Aadhaar Seeding) बँक खात्यासोबत जोडलेले असावे, भूधारणा माहिती / जमीन नोंद पडताळणी अद्ययावत असावी यापैकी कोणतीही गोष्ट अपूर्ण असल्यास, हप्ता रोखला जाऊ शकतो. PM Kisan Yojana 20th installment update
राज्यातील गायरन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत शासनाचा मोठा निर्णय
योजनेची अंमलबजावणी फेब्रुवारी 2019 पासून सुरू झाली असून आजपर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 19 हप्ते 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. म्हणजेच सुरुवातीपासून लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना एकूण 38,000 रुपये मिळाले आहेत.
शेतकरी www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या नावावर किती हप्ते जमा झाले आहेत, कोणता हप्ता प्रलंबित आहे, ई-केवायसी स्थिती तपासू शकतात. केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवर, महाराष्ट्र सरकारने “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” सुरू केली आहे.
या योजनेद्वारेही राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात. सध्या या योजनेचे 6 हप्ते वितरित झाले आहेत आणि 7 व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. राज्य सरकार लवकरच या योजनेच्या पुढील टप्प्याची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.